Cheteshwar Pujara : पुजारावर एका सामन्याची बंदी | पुढारी

Cheteshwar Pujara : पुजारावर एका सामन्याची बंदी

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारताचा फलंदाज चेतेश्वर (Cheteshwar Pujara) पुजारावर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने कौंटी चॅम्पियनशिपच्या एका सामन्याची बंदी घातली आहे. ससेक्स कौंटी क्लबचा कर्णधार पुजारावर त्याचा सहकारी जॅक कार्सन आणि टॉम हेन्स यांच्या खेळ भावनाहीन वर्तनामुळे बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय ससेक्स क्लबला 12 गुणांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

भारताचा चेतेश्वर पुजारा सध्या इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट खेळत आहे. तो ससेक्सचा कर्णधार आहे; पण सहकार्‍यांच्या कृतीमुळे त्याच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय ससेक्सवर 12 गुणांचा दंड ठोठावण्यात आला

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने ही माहिती दिली. गुणांच्या पेनल्टीमुळे पुजाराच्या नेतृत्वाखालील संघ गुणतालिकेत खाली आला आहे. पुजाराचे निलंबन आणि 12 गुणांच्या कपातीव्यतिरिक्त, हेन्स आणि कार्सन यांना ससेक्सच्या डर्बीशायरविरुद्ध 19 सप्टेंबर रोजी होणार्‍या पुढील सामन्यातूनही वगळण्यात आले आहे.

नेमकं काय घडलं? (Cheteshwar Pujara)

22 वर्षीय ऑफस्पिनर कार्सनने लीसेस्टरशायरच्या बेन कॉक्सला नॉन स्ट्रायकरवर बाद करण्याचा प्रयत्न केला. यावरून दोघांमध्ये वाद झाला होता. त्याने ससेक्स वेबसाईटवर केलेल्या कृतीबद्दल माफीही मागितली आहे. शेवटच्या दिवशी ओपनस हेन्सचेही भांडण झाले होते आणि त्याबद्दल त्याने माफीही मागितली आहे. यानंतर मैदानावरील पंचांनी दोन्ही खेळाडूंवर लेव्हल वन आणि लेव्हल टूच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता.

Back to top button