Asia CUP Final 2023 : सामना एक, 'विक्रम' अनेक!

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि श्रीलंका यांच्यात आज (१७ सप्टेंबर) आशिया चषकाचा अंतिम सामना झाला. भारताने 10 गडी राखून सामना जिंकत आठव्यांदा या स्पर्धेमध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले. या अंतिम सामन्यात अनेक विक्रमांची नोंद झाली. याविषयी जाणून घेवूया…
स्टेडियमवर श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय चुकीचा ठरला. श्रीलंकेचा संपूर्ण संघ ५० धावांवर बाद झाला. भारतीय संघाने 6.1 षटकात बिनबाद 51 धावा करत सामना जिंकला.
वेगवान गोलंदाजांनी सर्व विकेट घेण्याची दुसरी वेळ
आशिया चषकात एखाद्या संघाच्या वेगवान गोलंदाजांनी विरोधी संघाच्या सर्व 10 विकेट्स घेण्याची ही दुसरी वेळ आहे. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने सनसनाटी गोलंदाजी करत सात षटकांत सहा गडी बाद केले. हार्दिक पंड्याने तीन आणि जसप्रीत बुमराहने एक विकेट घेतली. यापूर्वी आशिया चषक स्पर्धेमध्येच पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनी भारताविरुद्धच्या समान्यात सर्व १० विकेट घेतल्या होत्या.
सिराज ठरला श्रीलंकेविरुद्धचा आशिया चषकातील सर्वोत्तम गोलंदाज
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने २१ धावा देत सहा विकेट घेतल्या. श्रीलंकेविरुद्धचा तो सर्वोत्तम भारतीय गोलंदाज ठरला आहे. सिराजने पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वकार युनूसला पिछाडीवर टाकले आहे. वकार युनूस याने १९९० मध्ये श्रीलंकेविरुद्ध 26 धावा देत सहा विकेट घेतल्या होत्या.
एकदिवसीय सामन्यात भारतासाठी सर्वोत्तम गोलंदाज
वन-डे सामन्यात भारताच्या वतीने स्टुअर्ट बिन्नी याने २०१४ मध्ये बांगलादेशविरुद्ध मीरपूर येथे चार धाव देत ६ विकेट घेतल्या होत्या. त्यापूर्वी अनिल कुंबळे याने १९९३ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात १२ धावा देत ६ बळी घेतलेहेते. तर जसप्रीत बुमराह याने २०२२ मध्येइंग्लंडमधील ओव्हल मैदानावर १९ धावांमध्ये ६ विकेट घेतल्या होता. या यादीत मोठ्या दिमाखात मोहम्मद सिराज याने एन्ट्री केली आहे. त्याने आशिया चषक स्पर्धेत २१ धावा देत सहा विकेट घेतल्या.
श्रीलंकेच्या नावावर नामुष्कीजनक विक्रमाची नोंद
आशिया चषक अंतिम सामन्यात श्रीलंकेचा संघ 15.2 षटकांत 50 धावांत सर्वबाद झाला. श्रीलंकेचा संघ कमी षटकांत सर्वबाद होण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोणत्याही एकदिवसीय स्पर्धेच्या अंतिम सामन्यातीही ही निच्चांकी धावसंख्या ठरली आहे. श्रीलंकेने आपलाच विक्रम मोडला आहे. 15.2 षटकांत सर्वबाद होऊन या संघाने आपला २१ वर्षांपूर्वी विक्रम मोडला आहे. २००२मध्ये शारजा चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यातलंकेचा संघ पाकिस्तानविरुद्ध 16.5 षटकात ऑलआऊट झाला होता.
श्रीलंकेची भारताविरुद्ध निच्चांकी धावसंख्या
श्रीलंकेने ५० धावांवर रोखून एकदिवसीय क्रिकेटमधील आपली दुसरी सर्वात कमी धावसंख्या केली. याआधी २०१२ मध्ये पार्लमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तो ४३ धावांत ऑलआऊट झाला होता. भारताविरुद्धच्या विक्रमाचा विचार केला तर ५० धावा ही सर्वात कमी धावसंख्या ठरली. २०२३ मध्ये तो तिरुअनंतपुरममध्ये ७३ धावांवर बाद झाला होता.
श्रीलंकेने बांगलादेशला मागे टाकले
भारताविरुद्ध सर्वात कमी धावसंख्या करणारा संघ आता श्रीलंका बनला आहे. या बाबतीत बांगलादेशला मागे टाकले. बांगलादेशी संघाने भारताविरुद्ध २०१४ मध्ये मीरपूरच्या मैदानावर ५८ धावा केल्या होत्या. ५० धावा ही वनडे फायनलमधील सर्वात कमी धावसंख्या ठरली आहे. या बाबतीत श्रीलंकेने भारताला मागे टाकले. २००० मध्ये शारजाह कपमध्ये टीम इंडियाचा डाव ५४ धावांमध्ये गुंडाळला गेला हाेता.
The 2023 Asia Cup victory was a testament to our unity and determination! @mdsirajofficial 6-wicket haul was a standout in the finals, but it was the combined effort of our team that secured this prestigious trophy. Heartiest congratulations to the Indian Cricket Team and support… pic.twitter.com/Ytp7z7O8OX
— Jay Shah (@JayShah) September 17, 2023
हेही वाचा :
- Asia Cup 2023 : आशियात भारतच ‘किंग’; आठव्यांदा आशिया चषकावर कब्जा
- Asia CUP 2023 Final : श्रीलंकेच्या फलंदाजांची दाणादाण, जाणून घ्या वन-डेतील निच्चांकी धावसंख्या
- Mohammed Siraj-Asia Cup Final : सिराज नावाचे ‘तुफान’! मोडला २१ वर्षांपूर्वीचा विक्रम, अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय गाेलंदाज