Mohammed Siraj-Asia Cup Final : सिराज नावाचे ‘तुफान’! मोडला २१ वर्षांपूर्वीचा विक्रम, अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय गाेलंदाज | पुढारी

Mohammed Siraj-Asia Cup Final : सिराज नावाचे 'तुफान'! मोडला २१ वर्षांपूर्वीचा विक्रम, अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय गाेलंदाज

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि श्रीलंका यांच्यातील आशिया कपचा अंतिम सामना कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याचा हा निर्णय भारताच्या गोलंदाजांनी सपशेल चुकीचा ठरवला. लंकेचे ६ फलंदाज अवघ्या १२ धावांतच पॅव्हेलियनमध्ये परतले. मोहम्मद सिराजच्‍या भेदक मार्‍यासमाेर श्रीलंकेच्‍या फलंदाजांनी नांगी टाकली. सिराजने पहिल्‍या पाच विकेट केवळ चार धावा देत घेतल्‍या  (Mohammed Siraj- Asia Cup Final ) मोहम्मद सिराज 2002 नंतर भारताकडून पहिल्या 10 षटकांत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे.

सिराज वादळात श्रीलंका भुईसपाट

श्रीलंकेच्या डावाची सुरुवात खराब झाली. पहिल्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर जसप्रीत बुमराहने लंकेला पहिला धक्का दिला. त्याने कुसल परेराला केएल राहुलकरवी झेलबाद केले. परेराला खातेही उघडता आले नाही. यानंतर गोलंदाजीसाठी आलेल्या मोहम्मद सिराजने शानदार गोलंदाजी करत लंकेचा तडाखा दिला. त्याने सामन्याच्या चौथ्या षटकात चार विकेट घेतल्या. (Mohammed Siraj-Asia Cup Final)

त्याने चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर पथुम निसांकाला रवींद्र जडेजाकडून झेलबाद केले. निसांकाला चार चेंडूत दोन धावा करता आल्या. यानंतर तिसऱ्या चेंडूवर सदिरा समरविक्रमा एलबीडब्ल्यू आऊट केले. चौथ्या चेंडूवर त्याने चरित असलंकाला इशान किशनकरवी झेलबाद केले. यानंतर अखेरच्या चेंडूवर सिराजने धनंजय डी सिल्वाला यष्टिरक्षक राहुलकरवी झेलबाद केले. निसांकाला दोन तर धनंजयला चार धावा करता आल्या. त्याचवेळी समरविक्रम आणि असलंका यांना खातेही उघडता आले नाही. सिराजने एका षटकात ४ बळी टिपले. तत्पूर्वी, बुमराहने पहिल्याच षटकात कुसल परेराला यष्टिरक्षक राहुलकरवी झेलबाद केले होते. परेराला खातेही उघडता आले नाही. (Mohammed Siraj- Asia Cup Final)

सिराजची किलर बॉलिंग

बुमराहने विकेट्सच्या बाबतीत संघाचे खाते उघडले. ते पुढे नेण्याचे काम मोहम्मद सिराजने लिलया पार केले. त्याने डावातील चौथ्या षटकात चार बळी घेतले. श्रीलंकेच्या फलंदाजांना खेळपट्टी समजण्याच्या आत त्यांना पॅव्हेलियनमध्ये परत पाटवले. सिराजने पथुम निसांका, सदिरा समरविक्रमा, चारिथ असालंका आणि धनंजय डी सिल्वा यांना एकाच षटकात बाद केले. यानंतर डावातील सहाव्या षटकात दासुन शनाकाला बाद करत त्याने पाचवे यश मिळवले. सिराजने 10 चेंडूत पाच विकेट घेतल्या. यानंतर सामन्याच्या १२ व्या षटकामध्ये मोहम्मद सिराजने लंकेला मेंडिसच्या रूपात आणखी एक धक्का दिला. एका बाजून विकेट जात असताना संयमी खेळी करणाऱ्या मेंडिसला सिराजने क्लीन बोल्ड केले.

सिराजने घेतलेल्या विकेट

पहिली विकेट : चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर सिराजने निसांकाला बाद केले. बॅकवर्ड पॉइंटवर उभ्या असलेल्या रवींद्र जडेजाने निसांकाला झेलबाद केले. त्याला चार चेंडूत केवळ दोन धावा करता आल्या.

दुसरी विकेट : या स्पर्धेत चमकदार फलंदाजी करणारी सदीरा समरविक्रमाही या सामन्यात अपयशी ठरली. चौथ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर तो सिराजने बाद केला. समरविक्रमा खाते न उघडताच एलबीडब्ल्यू आऊट झाला.

तिसरी विकेट : चौथ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर सिराजला तिसरे यश मिळाले. यावेळी त्याचा बळी चरित असलंका बनला. त्याने कव्हरच्या दिशेने एक शॉट खेळला आणि इशान किशनने अप्रतिम झेल घेतला. अस्लंका खाते उघडू शकले नाही.

चौथी विके़ट : धनंजय डी सिल्वा हा सिराजचा चौथा बळी ठरला. चौथ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर डी सिल्वाला सिराजचा आऊटस्विंगर नीट खेळता आला नाही आणि चेंडू यष्टीरक्षक केएल राहुलच्या हातात गेला. डी सिल्वाने दोन चेंडूत चार धावा केल्या. त्याने चौकार मारला.

पाचवी विकेट : सहाव्या षटकातील चौथ्या चेंडूवर सिराजने पाचवे यश मिळवले. त्याने वनडे कारकिर्दीत पहिल्यांदाच एका सामन्यात पाच विकेट्स घेतल्या. यावेळी श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका सिराजचा बळी ठरला. शनाकाने चार चेंडूंचा सामना केला. तो खाते न उघडताच क्लीन बोल्ड झाला.-***3

सहावी विकेट : सामन्याच्या १२ व्या षटकामध्ये मोहम्मद सिराजने लंकेला मेंडिसच्या रूपात आणखी एक धक्का दिला. एका बाजून विकेट जात असताना संयमी खेळी करणाऱ्या मेंडिसला सिराजने क्लीन बोल्ड केले. मेंडिसने आपल्या खेळीत ३४ चेंडत १७ धावा केल्या.

सिराजने मोडला २१ वर्षांपूर्वीचा विक्रम

मोहम्मद सिराज 2002 नंतर भारताकडून पहिल्या 10 षटकांत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. सिराजने श्रीलंकेच्या डावाच्या 10 षटकांत पाच बळी घेतले. या बाबतीत त्याने जवागल श्रीनाथ, भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांना मागे टाकले. श्रीनाथनने 2003 मध्ये जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिकेत श्रीलंकेविरुद्ध चार विकेट घेतल्या होत्या. भुवनेश्वर कुमारने 2013 मध्ये पोर्ट ऑफ स्पेनमध्ये श्रीलंकेविरुद्ध चार विकेट घेतल्या होत्या. त्याचवेळी जसप्रीत बुमराहने 2022 षटकात इंग्लंडविरुद्ध चार विकेट घेतल्या होत्या.

हेही वाचा : 

Back to top button