Luis Rubiales kiss row | महिला फुटबॉल खेळाडूचे घेतले चुंबन, ‘फिफा’ची स्पेन संघ अध्यक्षावर कारवाई | पुढारी

Luis Rubiales kiss row | महिला फुटबॉल खेळाडूचे घेतले चुंबन, 'फिफा'ची स्पेन संघ अध्यक्षावर कारवाई

पुढारी ऑनलाईन डेस्क : महिला विश्वचषकमध्ये स्पेनच्या विजयानंतर महिला खेळाडू जेनी हर्मोसोचे स्पेन फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष लुइस रुबियालेस यांनी चुंबन घेतले होते. हे प्रकरण त्यांना चांगलेच महागात पडले आहे. कारण आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाने (फिफा) लुइस रुबियालेस यांना ९० दिवसांसाठी निलंबित केले आहे. (Luis Rubiales kiss row)

फिफाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, फिफा शिस्तपालन समितीचे अध्यक्ष हॉर्जे इवान पलासियो यांनी लुइस रुबियालेस यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील फुटबॉलशी संबंधित सर्व उपक्रमातून अस्थायी निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रुबियालेस शुक्रवारी राजीनामा देणार होते. परंतु त्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला. हर्मोसोने सांगितले की त्यांनी चुंबन देण्यास सहमती दिली नव्हती, तरीही आरएफईएफ ने त्यांच्या बचावासाठी कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिली होती. (Luis Rubiales kiss row)

निवेदनात असे म्हटले आहे की, शिस्तपालन समितीने रुबियालेस आणि आरएफईएफच्या अधिकाऱ्यांना हर्मोसो किंवा त्यांच्या आजूबाजूच्या लोकांशी संपर्क साधण्यास मनाई केली आहे. लुइस रुबियालेस आरएफईएफ आणि (युरोपीय फुटबॉल निकाय) यूईएफए यांना फीफा शिस्तपालन समितीच्या अध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयाचे योग्य पालन करण्याची सूचना देण्यात आली आहे.

स्पेन महिला संघाने विश्वचषक फायनलमध्ये इंग्लंडला पराभूत केल्यानंतर रुबियालेसने हर्मोसोला पकडून त्यांच्या ओठावर चुंबन केले होते. त्यानंतर विश्वचषक जिंकणाऱ्या स्पेन संघासह अनेक अन्य खेळाडू हर्मोसोच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले होते.

हेही वाचा 

Back to top button