World Cup Team India Announcement : ‘अनफिट’ केएल राहुलची चांदी! ‘या’ स्टार खेळाडूंचा स्वप्नभंग

World Cup Team India Announcement : ‘अनफिट’ केएल राहुलची चांदी! ‘या’ स्टार खेळाडूंचा स्वप्नभंग

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : World Cup Team India Announcement : वनडे वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी मंगळवारी श्रीलंकेतील कँडी येथे पत्रकार परिषद घेत संघातील 15 खेळाडूंच्या नावांची घोषणा केली. यावेळी त्यांच्यासोबत संघाचा कर्णधार रोहित शर्माही उपस्थित होता. भारतात 5 ऑक्टोबरपासून एकदिवसीय विश्वचषकाला सुरुवात होत आहे. भारताचा पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी चेन्नईच्या चेपॉक मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे.

आशिया चषक संघातील 18 पैकी 15 खेळाडूंची निवड

श्रीलंकेत सुरू असलेल्या आशिया चषकासाठी निवडलेल्या भारताच्या संघातील 18 सदस्यांपैकी 15 खेळाडूंनी विश्वचषक संघात स्थान मिळवले आहे. तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा आणि स्टँडबाय खेळाडू संजू सॅमसन यांना विश्वचषक संघात स्थान मिळवता आलेले नाही. युझवेंद्र चहल, आर अश्विन या फिरकीपटूंनाही डावलण्यात आले आहे. (World Cup Team India Announcement)

असा आहे भारतीय संघ : (World Cup Team India Announcement)

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news