Asia Cup 2023 : आशिया चषकातील सुपर-4 सामने कोलंबोऐवजी दाम्बुलामध्ये?

Asia Cup 2023 : आशिया चषकातील सुपर-4 सामने कोलंबोऐवजी दाम्बुलामध्ये?
Published on
Updated on

कोलंबो; वृत्तसंस्था : भारत-पाकिस्तान यांच्यातला महत्त्वाचा सामना पावसामुळे रद्द करावा लागला अन् चाहत्यांच्या आनंदावर पाणी फिरले. एवढी महत्त्वाची मॅच रद्द झाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. भारत-नेपाळ या सामन्यावरही पावसाचे सावट आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांकडून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. आशियाई क्रिकेट परिषद आशिया चषक स्पर्धेतील कोलंबोत होणार्‍या सुपर- 4 च्या लढती दुसर्‍या ठिकाणी खेळवण्याच्या हालचाली करत आहेत. (Asia Cup 2023)

श्रीलंकेची राजधानी असलेल्या कोलंबो येथे मागील काही दिवसांपासून मुसळदार पाऊस पडतोय आणि शहरामध्ये पूरस्थिती निर्माण झाल्याचे पाहायला मिळतेय. त्यामुळे एसीसी कोलंबो येथील सामने पल्लेक्कल व दाम्बुला येथे खेळवण्याचा विचार करत आहेत.

आशिया चषकाचे पुढचे सामने कोलंबो येथून दाम्बुला येथे खेळवण्यात यावेत, असे श्रीलंका क्रिकेट मंडळाने सूचविले आहे. श्रीलंकेतील हा भाग कोरडा आहे. परंतु, ब्रॉडकास्टर आणि संघाने दाम्बुला, पल्लेक्कल व कोलंबो असा प्रवास करण्यास नकार दिल्याचे समजते आहे. सुपर-4 मधील पहिला सामना 9 सप्टेंबरला कोलंबो येथे होणार आहे. परंतु, हवामान खात्यानुसार मुसळधार पावसाची शक्यत आहे. येत्या 24-48 तासांत याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

नजम सेठी यांची टीका

आशिया चषकाचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. परंतु, 'बीसीसीआय'च्या विरोधामुळे हायब्रिड मॉडेलमध्ये ही स्पर्धा पाकिस्तान व श्रीलंका येथे खेळवली जात आहे. भारताने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने पाकिस्तानला त्यांच्याविरुद्धचा सामना श्रीलंकेत खेळावा लागला; पण हा सामना पावसामुळे रद्द करावा लागला. नजम सेठी यांनी ट्विट करून सांगितले की, आम्ही दुबईचा प्रस्ताव ठेवलेला, परंतु तो फेटाळला गेला. मग आता सामना रद्द करावा लागला याला जबाबदार कोण?

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news