Asia Cup 2023 : भारताच्‍या दुसर्‍या सामन्‍यावरही पावसाचे ‘ढग’, हवामान विभागाने वर्तवला ‘हा’ अंदाज | पुढारी

Asia Cup 2023 : भारताच्‍या दुसर्‍या सामन्‍यावरही पावसाचे 'ढग', हवामान विभागाने वर्तवला 'हा' अंदाज

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आशिया चषक स्‍पर्धेत हाय व्होल्टेज भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) सामना शनिवारी ( दि. २ सप्‍टेंबर) रोजी श्रीलंकेतील कँडी येथे झाला. मात्र दुसर्‍या डावात पावसाचा खेळ झाला आणि हा सामना रद्द करण्यात आला. आता सोमवार, ४ सप्‍टेंबर राेजी याच कँडी शहरातील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार्‍या भारताचा नेपाळविरुद्धच्या दुसऱ्या सामन्याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधले आहे. दरम्‍यान, हवामान विभागाने सोमवारी दुपारी वादळी वार्‍यासह पावसाची शक्‍यता व्‍यक्‍त केली आहे. सुमारे ७६ टक्‍के पावसाची शक्‍यता असल्‍याचे हवामान विभागाने म्‍हटले आहे. (Asia Cup 2023 India vs Nepal)

आशिया चषक स्‍पर्धेतील भारताचा नेपाळविरुद्धचा सामना सोमवारी दुपारी ३ वाजता सुरु होणार आहे. मात्र कँडी येथे दिवसभर पावासाचा अंदाज व्‍यक्‍त करण्‍यात आला आहे. सामना सुरू होण्यापूर्वी म्‍हणजे दुपारी १ वाजता पावसाची शक्‍यता ही ६६ टक्‍के आहे तर दुपारी तीन वाजता ही टक्‍केवारी ७६ इतकी आहे. त्‍यामुळे सामन्‍यावर पावसाचे सावट कायम राहणार आहे. मात्र सायंकाळी पाचनंतर पावसाची शक्‍यता २३ टक्‍के इतकी असल्‍याचा अंदाज हवामान विभागाने व्‍यक्‍त केला आहे.

Asia Cup 2023 India vs Nepal : दुसरा सामना रद्द झाल्‍यास काय होणार?

मुसळधार पावसामुळे सोमवारीचा सामना रद्द झाल्‍यास दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. एकूण दोन गुणांसह भारत सुपर फोर टप्प्यासाठी पात्र ठरणार आहे. कारण पहिला सामना 238 धावांच्या फरकाने गमावल्यानंतर सोमवारचा सामना रद्द झाला तर नेपाळला केवळ एक गुणावर समाधान मानावे लागणार आहे.

हेही वाचा :

 

 

Back to top button