R Praggnanandhaa : आर. प्रज्ञानंदचे चेन्नईत जल्लोषात स्वागत; मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन | पुढारी

R Praggnanandhaa : आर. प्रज्ञानंदचे चेन्नईत जल्लोषात स्वागत; मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशातील सर्वात तरुण ग्रँडमास्टर आणि बुद्धिबळपटू आर. प्रज्ञानंद (R Praggnanandhaa) बुद्धिबळ विश्वचषकात सर्वोत्तम कामगिरी करून मायदेशी परतला आहे. बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत जगातील अनेक सर्वोत्तम खेळाडूंना पराभूत केल्यानंतर १८ वर्षीय प्रज्ञानंदचे मोठे कौतुक होत आहे. दरम्यान, प्रज्ञानंदचे आज चेन्नईत आगमन झाले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक त्याची वाट पाहत उभे होते. त्याचे आगमन होताच चाहत्यांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगाचा व्हिडिओही समोर आला आहे, यात चेन्नईतील लोकांचे त्यांच्यावरील प्रेम पाहायला मिळत आहे.

आर. प्रज्ञानंदने 140 कोटी लोकांच्या स्वप्नांचा प्रतिध्वनी केला, बुद्धिबळ विश्वचषकात रौप्य पदक जिंकल्याबद्दल मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी त्याचे अभिनंदन केले. यावेळी प्रज्ञानंदने (R Praggnanandhaa) उत्साही आणि भव्य स्वागताबद्दल आनंद व्यक्त केला. आणि मनापासून कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या पाठीशी उभे राहिलेल्या सर्वांचे आभार मानले. लोकांच्या प्रोत्साहनाचा माझ्या प्रवासात मोलाचा वाटा आहे, असेही त्याने म्हटले आहे.

बुद्धिबळ विश्वचषकात आश्चर्यकारक कामगिरी करणाऱ्या प्रज्ञानानंदच्या आई-वडिलांचाही त्याच्या यशात मोलाचा वाटा आहे. विशेषत: त्याची आई नागलक्ष्मी आजही प्रत्येक परदेश दौऱ्यावर त्याच्यासोबत जाते आणि स्वत:च्या हाताने जेवण बनवून त्याला खाऊ घालते, जेणेकरून मुलाची तब्येत चांगली राहावी आणि त्याला कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागू नये.

प्रज्ञानंधाने बुद्धिबळ विश्वचषकात त्याच्या प्रशिक्षकाशिवाय चमकदार कामगिरी केली. त्याने सामन्यानुसार चांगली कामगिरी केली. अंतिम फेरीत जगातील नंबर वन मॅग्नस कार्लसनकडून पराभूत झाल्यानंतर तो बुद्धिबळ विश्वचषकातील सर्वात तरुण खेळाडू ठरला. याआधी त्याने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या हिकारू नाकामुरा आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या फॅबियानो कारुआना यांनाही पराभूत केले. तथापि, तो म्हणाला की त्याच्यासाठी सर्वात कठीण सामना देशबांधव अर्जुन एरिगेविरुद्ध होता.

आनंद महिंद्रा प्रज्ञानंदला देणार XUV400 EV भेट

दरम्यान, महिंद्रा समूहाचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनी प्रज्ञानंदसाठी पर्यावरण प्रदूषण कमी करणारी XUV400 EV भेट देण्याचे जाहीर केले आहे. यापूर्वीही जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकणार्‍या नीरज चोपडा यांना आनंद महिंद्रा यांनी थार जीप देऊन सन्मानित केले होते.

हेही वाचा 

Back to top button