FIFA Women’s World Cup : स्पेन संघाची फिफा विश्वचषकावर मोहोर, अंतिम सामन्यात इंग्लंडवर 1-0 ने विजय | पुढारी

FIFA Women's World Cup : स्पेन संघाची फिफा विश्वचषकावर मोहोर, अंतिम सामन्यात इंग्लंडवर 1-0 ने विजय

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्पेनने महिला फिफा विश्वचषक 2023 चे विजेतेपद पटकावले आहे. ऑस्ट्रेलियातील सिडनी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात स्पॅनिश संघाने इंग्लंडचा 1-0 असा पराभव केला. या विजयात स्पेनची कर्णधार ओल्गा कार्मोना (29वे मिनिट) हिचा एकमेव गोल निर्णायक ठरला. (FIFA Women World Cup)

स्पॅनिश संघाने पहिल्यांदाच स्पर्धेची अंतिम फेरी गाठून पहिल्याच प्रयत्नात विश्वचषकाच्या ट्रॉफीवर नाव कोरले आहे. अंतिम फेरीत त्यांच्या समोर इंग्लंडसारख्या बलाढ्य संघाचे आव्हान होते. पण पुरुष संघाप्रमाणे महिला संघाने टीकी-टाका या शॉर्ट पासिंगच्या रणनितीचा अवलंब करत इंग्लिश संघावर केवळ एक गोलच्या फरकाने मात केली.

सामन्याच्या सुरूवातीपासून स्पेनने वर्चेस्व राखले. त्यांनी आक्रमक खेळी करत गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या. परंतु, इंग्लंडच्या बचावपटूंनी स्पॅनिश आक्रमण परतवून लावले. त्यामुळे स्पेनला गोल करण्यात यश आले नाही. इंग्लंडने 16 व्या मिनिटाला आक्रमण करत स्पेनच्या बचावफळीवर दबाव आणला. रॅचेल डेलीच्या पासवर इंग्लंडच्या हेम्पने अप्रतिम शॉट मारला, पण चेंडू क्रॉसबारला लागला. यानंतर स्पेनने पलटवार केला. यावेळी स्पेनच्या खेळाडूने मारलेला शॉट इंग्लंडच्या गोलकीपरने अडवला. (FIFA Women World Cup)

स्पेनने घेतली आघाडी

स्पेनच्या कार्मोनाने २९ व्या मिनिटाला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. ही आघाडी कमी करण्यासाठी इंग्लंडच्या खेळाडूंनी शॉर्ट पासिंग करत गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या. परंतु फिनिशिंगच्या अभावे त्यांना गोल करण्यात यश आले नाही. सामन्याच्या दुसऱ्या हाफमध्ये इंग्लंडने आक्रमक खेळी करण्याचा प्रयत्न केला. परंतु स्पेनच्या बचावपटूंनी केलेल्या उत्तम कामगिरीमुळे त्यांना गोल करता आला नाही. सामन्यात इंग्लंडच्या खेळाडूंनी संथ खेळी केली. याचा फायदा घेत स्पेन सातत्याने गोल करण्याचे प्रयत्न केले.

दरम्यान सामन्यात दोन्ही संघाची आक्रमक खेळीचा अवलंब करत गोल करण्याचा प्रयत्न केला. परंतु यात दोन्ही संघांना यात यश आले नाही. सामन्याच्या ६४ व्या मिनिटाला इंग्लंडच्या वॉल्शने डेंजर झोनमध्ये फाऊल केला. यामुळे रेफरींनी स्पेनला पेनल्टी किक बहाल केली. यावेळी स्पेनच्या हर्मोसोने पेनल्टी स्ट्रोक घेतला. परंतु इंग्लंडची गोलकीपरने अडवला. यानंतर अनेक चढाया रचुनही इंग्लंडला गोल करण्यात यश आले नाही. सामन्याच्या २९ व्या मिनिटाला स्पेनच्या ओल्गा कार्मोनाने केलेल्या एकमेव गोलमुळे स्पेन जगजेत्ता बनला.

हेही वाचा;

Back to top button