Asian Games | आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला फुटबॉल संघाची घोषणा; माजी कर्णधार बाला देवीचे पुनरागमन | पुढारी

Asian Games | आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला फुटबॉल संघाची घोषणा; माजी कर्णधार बाला देवीचे पुनरागमन

पुढारी ऑनलाईन डेस्क : चीन येथे होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी २२ सदस्यीय भारतीय फुटबॉल संघाची घोषणा शुक्रवारी (दि. २५) करण्यात आली आहे. यामध्ये भारतीय फुटबॉल संघाची माजी कर्णधार आणि स्टार स्ट्रायकर बाला देवीने भारतीय महिला फुटबॉल संघात पुनरागमन केले आहे. बाला देवीने चार वर्षांनंतर संघात पुनरागमन केले आहे. देवी २०१९ मध्ये दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळली होती. तिने देशासाठी ४६ सामन्यांत २६ गोल केले आहेत. (Asian Games)

आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत विक्रमी ६३४ भारतीय खेळाडू सहभागी होणार आहेत. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने शुक्रवारी ६३४ खेळाडूंना खेळण्यास मान्यता दिली. आशियाई क्रीडा स्पर्धा दि. २३ सप्टेंबरपासून चीनमधील हांगझोऊ येथे होणार आहेत. २०१८ साली जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ५७२ भारतीय खेळाडूंनी सहभाग घेतला होता. (Asian Games)

भारतीय महिला फुटबॉल संघ : बाला देवी, अस्तम ओराव, ज्योती, मनीषा, रेणू, रितू राणी, संजू, संगीता बसफोर, इलांगबम चानू, दालिमा छिब्बर, ग्रेस डांगमेई, सौम्या गुगुलोथ, श्रेया हुडा, इंदुमती कथिरेसन, आशालता देवी, प्रियांका देवी, एन. देवी, आर संध्या, रंजना चानू, अंजू तमांग, जक्सा.

हेही वाचा;

Back to top button