Shreyas Iyer No.4 Batsman : श्रेयस अय्यर क्रमांक 4 साठी सर्वोत्तम पर्याय! जाणून घ्या आकडेवारी | पुढारी

Shreyas Iyer No.4 Batsman : श्रेयस अय्यर क्रमांक 4 साठी सर्वोत्तम पर्याय! जाणून घ्या आकडेवारी

पुढारी ऑनलाईन डेस्क : Shreyas Iyer No.4 Batsman : आशिया चषक स्पर्धेला (Asia Cup 2023) 30 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. तत्पूर्वी सोमवारी बीसीसीआयने (BCCI) भारतीय क्रिकेट संघाची (Team India) घोषणा केली. या संघात श्रेयस अय्यरचे (Shreyas Iyer) पुनरागमन झाले असून तो जवळपास 8 महिन्यांनंतर मैदानात उतरणार आहे. दुखापतीमुळे तो संघातून बाहेर पडला होता. त्याच्या पुनरागमनामुळे संघाची मधली फळी मजबूत झाली असून चौथ्या क्रमांकाची समस्याही दूर झाल्याची चर्चा आहे.

अय्यर हा क्रमांक 4 चा सर्वोत्तम पर्याय का आहे? (Shreyas Iyer No.4 Batsman)

अय्यरने (Shreyas Iyer No.4 Batsman) वनडे क्रिकेटमध्ये नंबर-4 वर 20 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 47.35 च्या सरासरीने 805 धावा केल्या आहेत. चौथ्या क्रमांकावर खेळताना त्याने 2 शतके आणि 5 अर्धशतके फटकावली आहेत. तसेच तो तीन वेळा नाबाद राहिला आहे. आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर अय्यर सावधपणे डाव सांभाळतो आणि शेवटच्या षटकांमध्ये वेगवान फलंदाजी करतो. त्यामुळे चौथ्या क्रमांकावरील त्याची धावांची आकडेवारी आश्वासक आहे.

2022 मध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा (Shreyas Iyer No.4 Batsman)

अय्यर (Shreyas Iyer No.4 Batsman) हा 2022 मध्ये भारतासाठी वनडेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने 17 सामन्यात 55.69 च्या सरासरीने 724 धावा केल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 91.52 होता. त्याने 113 च्या सर्वोत्तम स्कोअरसह 1 शतक आणि 6 अर्धशतके झळकावली. या वर्षी अय्यरला केवळ 3 वनडे खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याने 31.33 च्या सरासरीने 94 धावा केल्या.

वनडे क्रिकेटमध्ये सलग 4 अर्धशतके

अय्यरने (Shreyas Iyer) 2019 साली वेस्ट इंडिजविरुद्ध सलग 4 डावात अर्धशतके झळकावली होती. पहिल्या सामन्यात त्याने 71 धावांची खेळी केली होती. यानंतर 65, 70 आणि 53 धावांच्या लक्षवेधी खेळी साकारल्या होत्या. अय्यर (Shreyas Iyer) हा भारतासाठी वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 1,000 धावा करणारा 5वा खेळाडू आहे. त्याने 28 सामन्यांमध्ये हा पराक्रम केला होता. याबाबतीत शुभमन गिल आघाडीवर आहे. त्याने केवळ 19 सामन्यांत भारतासाठी सर्वात जलद 1000 धावा केल्या आहेत.

अय्यरची वनडे कारकिर्द

अय्यरने (Shreyas Iyer) भारतासाठी आतापर्यंत 42 वनडे सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 46.60 च्या सरासरीने 1,631 धावा केल्या आहेत. त्याने 96.50 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आहे. यादरम्यान त्याच्या खात्यात 2 शतके आणि 14 अर्धशतके जमा आहेत.

Back to top button