Rinku Singh : रिंकू टीम इंडियाचा फिनिशर बनू शकतो : किरण मोरे | पुढारी

Rinku Singh : रिंकू टीम इंडियाचा फिनिशर बनू शकतो : किरण मोरे

मुंबई; वृत्तसंस्था : रिंकूने 21 चेंडूंत 3 षटकार आणि 2 चौकार ठोकून 38 धावा कुटल्या. रिंकूच्या या जबरदस्त फलंदाजीबद्दल टीम इंडियाचे माजी विकेटकिपर किरण मोरे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. (Rinku Singh)

रिंकू सिंह भविष्यात भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि दिग्गज खेळाडू युवराज सिंग यांच्यासारखा फिनिशर होऊ शकतो. रिंकूकडे टीम इंडियाचा आक्रमक फिनिशर बनण्याची क्षमता आहे, असे मोरे यांनी म्हटले आहे. (Rinku Singh)

माध्यमांशी प्रतिक्रिया देताना मोरे म्हणाले, रिंकू सिंहला टीम इंडियात संधी मिळावी, असे मला नेहमीच वाटत होते. 5 व्या किंवा 6 व्या क्रमांकावर तो चांगली फलंदाजी करू शकतो. रिंकूकडे एक आक्रमक फिनिशर म्हणून फलंदाजी करण्याची क्षमता आहे. आपण एम. एस. धोनी आणि युवराज सिंगची फलंदाजी पाहिली आहे; पण हे दोन्ही दिग्गज खेळाडू निवृत्त झाल्यानंतर आपल्याला त्यांच्यासारखा खेळाडू मिळाला नाही. काही खेळाडूंना संधी देण्यात आली; पण त्यांना फिनिशर म्हणून छाप टाकता आली नाही.

हेही वाचा;

Back to top button