Asia Cup Rohit Sharma: आशिया कपमध्ये चौथ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करेल? रोहित शर्मा म्हणाला… | पुढारी

Asia Cup Rohit Sharma: आशिया कपमध्ये चौथ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करेल? रोहित शर्मा म्हणाला...

पुढारी ऑनलाईन डेस्क : Asia Cup Rohit Sharma : श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये खेळल्या जाणाऱ्या आशिया कपसाठी (Asia Cup) टीम इंडियाची (Team India) घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने (BCCI) सोमवारी एक बैठक आयोजित केली होती त्यानंतर 17 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली. बैठक संपल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Team India Captain Rohit Sharma) पत्रकार परिषद घेऊन संघाच्या अनेक समस्यांवर आपली उत्तरे दिली. त्यापैकी चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजीच्या समस्येवरही खुलासा केला.

चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार? (Asia Cup Rohit Sharma)

भारतीय संघासमोर (Team India) सर्वात मोठी समस्या चौथ्या क्रमांकाची आहे. यासाठी संघाने अनेक खेळाडूंना या क्रमांकावर फांदाजीसाठी आजमावून पाहिले. पण या क्रमांकावर जबाबदारीने फलंदाजी करणारा फलंदाज आजतागायत गवसलेला नाही. नुकतेच आशिया कपसाठी (Asia Cup) जाहीर करण्यात आलेल्या संघात असे अनेक खेळाडू आहेत जे या स्थानावर खेळू शकतात. पण ते किती यशस्वी ठरतील हे येणा-या सामन्यांतून स्पष्ट होईल. यामध्ये श्रेयस अय्यर (Shreyas Iyer), तिलक वर्मा (Tilak Varma), सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याचे नाव आघाडीवर आहे.

श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकासाठी दावेदार?

भारताच्या आशिया कप संघात (Asia Cup Team India Squad) अनेक मधल्या फळीतील फलंदाजांची निवड करण्यात आली आहे. चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार, हे अद्याप निश्चित झाले नसले तरी श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर खेळणार असल्याचे मानले जात आहे. विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर खेळताना दिसणार आहे. जर केएल राहुल (KL Rahul) सुरुवातीच्या सामन्यांत खेळू शकला नाही तर त्याच्या जागी इशान किशनला संधी दिली जाऊ शकते, परंतु ईशानची समस्या ही आहे की तो ओपनिंगमध्येच वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करतो. मग त्याला चौथ्या क्रमांकावर पाठवण्याचा निर्णय संघ व्यवस्थापन घेणार का? या प्रश्नाचे उत्तर अगामी स्पर्धेतून मिळेल.

रोहित शर्मा म्हणाला… (Asia Cup Rohit Sharma)

फक्त एका स्थानावर चांगली फलंदाजी करून सामने जिंकले जाऊ शकत नाहीत. हे खरे आहे की, नंबर चारच्या फलंदाजाची भूमिका महत्त्वाची असते. पण तो प्रत्येकवेळी एकट्याच्या जोरावर तुम्हाला सामना जिंकून देईलच हे शक्य नसते. संघासाठी 5, 6 आणि 7 व्या क्रमांकावर फलंदाजी करणारे खेळाडूंना सुद्धा मॅच विनरची भूमिका ताकदीने पार पाडू शकतात. अक्षर पटेलला नंबर चारवर आजमावण्यात आले. आम्ही अनेक प्रयोग केले, पण चांगले परिणाम आले नाहीत. विश्वचषकापूर्वी आमचे 9 सामने आहेत आणि त्या सर्वांना संधी मिळेल,’ असे भारतीय कर्णधाराने स्पष्ट केले.

आशिया कप 2023 साठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल, इशान किशन, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी , मोहम्मद सिराज, प्रसीद्ध कृष्णा.

 

Back to top button