AsiaCup2023: आशिया चषकसाठी भारतीय संघाची घोषणा; के. एल. राहुल, श्रेयस अय्यरचे पुनरागमन

पुढारी ऑनलाईन डेस्क : बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी आज (दि.२१) आशिया चषक २०२३ साठी भारतीय पुरूष संघाची निवड जाहीर केली. रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल, सुर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, हार्दिक पांड्या (उपकर्णधार) , रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शम्मी, मोहम्मद सिराज, पी कृष्णा आणि संजू सॅमसन असा आशिया चषक २०२३ साठी संघ असेल. (AsiaCup2023)
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आशिया कप 2023 (AsiaCup2023) साठी आपला संघ जाहीर केला आहे. अजित आगरकर दिल्लीत संघाची घोषणा केली. यावेळी रोहित शर्माही उपस्थित होता. 17 सदस्यीय संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे असेल. केएल राहुल, जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यर यांचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. युवा फलंदाज तिलक वर्मालाही संघात संधी मिळाली आहे. तर संजू सॅमसनला संघात स्थान मिळालेले आहे. हार्दिक पांड्याच्या उपकर्णधारपदावर प्रश्न उपस्थित केले जात होते, मात्र त्याला उपकर्णधारपदावर कायम ठेवण्यात आले आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 2 सप्टेंबरला आशिया चषकात पहिला सामना खेळणार आहे. हा सामना पाकिस्तान विरुद्ध श्रीलंकेतील कँडी येथे होणार आहे. यानंतर भारताचा दुसरा गट सामना 4 सप्टेंबररोजी नेपाळशी होणार आहे. आशिया चषक स्पर्धेत भारत, पाकिस्तान आणि नेपाळ एकाच गट-अ मध्ये आहेत. आशिया कप पाकिस्तानच्या यजमानपदावर हायब्रिड मॉडेलच्या आधारे खेळवला जात आहे.
रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, ईशान किशन आणि तिलक वर्मा या आठ फलंदाजांना भारतीय संघात स्थान मिळाले आहे. इशान आणि केएल राहुल यांपैकी एक जण विकेट कीपिंग करेल .
AsiaCup2023 : संघात या तीन अष्टपैलू खेळाडूंचा समावेश
उपकर्णधार हार्दिक पांड्याची खेळी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. हार्दिकची फलंदाजी स्फोटक आहे. तर त्याच्या गोलंदाजीलाही धार आहे. त्याच्याकडून भारतीय चाहत्यांना मोठ्या खेळाची अपेक्षा असेल. रवींद्र जडेजासोबत अक्षर पटेललाही अष्टपैलू म्हणून भारतीय संघात स्थान मिळाले आहे. अक्षरने गोलंदाजीसोबतच फलंदाजीतही आपली क्षमता अनेक वेळा सिद्ध केली आहे.
🚨 NEWS 🚨
India’s squad for #AsiaCup2023 announced.#TeamIndia
— BCCI (@BCCI) August 21, 2023
हेही वाचा