IND vs IRE 1st T20 Live : बॅरी मॅकार्थेचे शानदार अर्धशतक; भारतासमोर १४० धावांचे आव्हान | पुढारी

IND vs IRE 1st T20 Live : बॅरी मॅकार्थेचे शानदार अर्धशतक; भारतासमोर १४० धावांचे आव्हान

पुढारी ऑनलाईन डेस्क :  सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडची सुरुवात खराब झाली. भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराहने पुनरागमन करत पहिल्याच षटकात अँड्र्यू बालबर्नी आणि लॉरन टकर यांना बाद करून आयर्लंडला बॅकफूटवर ढकलले. यानंतर प्रसिद्ध कृष्णाने हॅरी टेक्टर आणि जॉर्ज डॉकरेल यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. पॉवरप्लेमध्ये चार गडी गमावून आयर्लंडला केवळ ३० धावा करता आल्या.

३१ धावांत पाच विकेट्स गमावल्यानंतर आयर्लंडची अवस्था बिकट बनली होती, परंतु मार्क एडेअर आणि कर्टिस कॅम्फर यांनी २८ धावांची भागिदारी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु एडेअर धावा करून १६ बाद झाला. त्याला बिश्नोईने तंबूचा रस्ता दाखवला.

आयर्लंडने ५९ धावांत सहा विकेट गमावल्या होत्या. यानंतर मॅकार्थेने कॅम्फरसोबत अर्धशतकी भागीदारी करत संघाची धावसंख्या १०० धावांच्या पुढे नेली. दोघांनीही वेगाने धावा केल्या. शेवटी अर्शदीपने केम्परला ३९ धावांवर क्लीन बोल्ड केले. मात्र, मॅकार्थेने दुसऱ्या टोकाने आक्रमक फलंदाजी करत आपल्या कारकिर्दीतील पहिले टी-२० अर्धशतक झळकावले. त्याने ३३ चेंडूत नाबाद ५१ धावांची खेळी केली आणि  १३९ धावांवर ७ बाद स्कोर फलकावर लावला.

अर्शदीपने शेवटच्या षटकात दिल्या २२ धावा

सामन्यात अर्शदीप सिंगने शेवटचे षटक टाकले यात त्याने २२ धावा दिल्या. मॅकार्थीने त्याच्याविरुद्ध दोन षटकार आणि एक चौकार लगावला. या षटकात अर्शदीपने नो बॉल आणि वाईड बॉलही टाकला, ज्यामुळे आयर्लंडचा संघ १३९ धावांपर्यंत मजल मारू शकला, तर १७व्या षटकातच आयर्लंडने १०० धावांचा टप्पा ओलांडला. १९ व्या षटकानंतर आयर्लंडची धावसंख्या ११७/७ होती. या सामन्यात  कर्णधार जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. अर्शदीप सिंगला एक विकेट मिळाली.

सामन्यासाठी  दोन्ही संघ :

भारत : जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), टिळक वर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई.

आयर्लंड : पॉल स्टर्लिंग (कर्णधार), अँड्र्यू बालबर्नी, लॉर्कन टकर (यष्टीरक्षक), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, मार्क अडायर, बॅरी मॅककार्थी, क्रेग यंग, ​​जोशुआ लिटल, बेंजामिन व्हाइट.

हेही वाचा;

Back to top button