Sarfaraz Khan Marriage | क्रिकेटर सरफराज खाननं काश्मिरी मुलीशी केलं गुपचूप लग्न, जाणून घ्या त्याची लव्ह स्टोरी | पुढारी

Sarfaraz Khan Marriage | क्रिकेटर सरफराज खाननं काश्मिरी मुलीशी केलं गुपचूप लग्न, जाणून घ्या त्याची लव्ह स्टोरी

शोपियान (जम्मू आणि काश्मीर) : पुढारी ऑनलाईन, मुंबईचा धडाकेबाज क्रिकेटर आणि युवा फलंदाज सरफराज खान (Cricketer Sarfaraz Khan Marriage) याने जम्मू आणि काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील एका मुलीशी लग्न केले आहे. त्याच्या लग्नाचे व्हिडिओ विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आले आहेत. या व्हिडिओंमध्ये रणजीमध्ये मुंबईसाठी आणि आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळणारा २५ वर्षाचा सरफराज खान काळ्या रंगाच्या शेरवानीमध्ये दिसत आहे. विशेष म्हणजे सरफराजचा गुपचूपपणे लग्न उरकले आहे. सरफराजने सोशल मीडियावर नव्या जोडीदारासोबतचा फोटो शेअर करून आनंद व्यक्त केला आहे.

आज तकच्या वृत्तानुसार, सरफराजचा निकाह जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील पाशपोरा गावात पार पडला आणि त्याच्या वधूचे नाव रोमाना जहूर असे आहे. रोमाना आणि सरफराज यांची पहिली भेट दिल्लीत झाली होती. येथून त्यांची प्रेमकहाणी सुरू झाली. रोमाना दिल्लीत एमएससीचे शिक्षण घेत होती, तर सरफराज खानची चुलत बहीण तिच्यासोबत शिकत होती. रोमाना सरफराजच्या चुलत बहिणीसोबत क्रिकेट मॅच पाहायला गेली होती. या दरम्यान सरफराज आणि रोमाना यांची भेट झाली. या पहिल्या भेटीनंतर लगेचच सरफराजने लग्न करण्याचा निर्णय घेतला.

सरफराज हा मुंबईतील देशांतर्गत क्रिकेटमधील प्रमुख खेळाडू आहे. त्याच्या नावावर त्रिशतकाची नोंद आहे आणि तो सतत धावा कुटत आहे. असेही सांगितले जात आहे की त्याचा टीम इंडियात समावेश होऊ शकतो. आयपीएलमध्ये तो दिल्ली कॅपिटल्सचा एक भाग आहे, तर तो विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून खेळला आहे. (Cricketer Sarfaraz Khan Marriage)

क्रिकेट कारकीर्द

प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणाऱ्या सरफराजने ३७ प्रथम श्रेणी सामन्यात ३,५०५ धावा केल्या आहेत. त्याच्या धावांची सरासरी ७९.६५ असून त्याने १३ शतके ठोकली आहेत. देशांतर्गत क्रिकेट सामन्यांत त्याची सर्वोच्च धावसंख्या ३०१ इतकी आहे.

लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने २६ सामन्यांमध्ये ३९.०८ च्या सरासरीने ४६९ धावा केल्या आहेत. लिस्ट क्रिकेटमध्येही त्याने दोन शतके केली आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by CricTracker (@crictracker)

हे ही वाचा :

Back to top button