BCCI Home Media Rights : बीसीसीआयला 88 सामन्यांतून 1 अब्ज डॉलर कमावण्याची संधी! पण…

BCCI Home Media Rights : बीसीसीआयला 88 सामन्यांतून 1 अब्ज डॉलर कमावण्याची संधी! पण…
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : BCCI Home Media Rights : जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड बीसीसीआय एक विशेष योजना बनवत असून यातून ते भरपूर कमाई करणार आहेत. 2024 ते 2028 या कालावधीत खेळल्या जाणार्‍या टीम इंडियाच्या देशांतर्गत 88 सामन्यांचे हक्क स्वतंत्रपणे विकण्याचा विचार बीसीसीआय करत आहे. यातून बोर्ड 1 अब्ज डॉलर (8200 कोटी रुपये) कमाईचा आकडा पार करू शकते.

टीम इंडिया येणा-या काळात 25 कसोटी, 27 एकदिवसीय आणि 36 टी-20 सामने खेळायचे आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 21 (5 कसोटी, 6 एकदिवसीय आणि 10 टी-20), इंग्लंडविरुद्ध 18 (10 कसोटी, 3 एकदिवसीय आणि 5 टी-20) या महत्त्वपूर्ण सामन्यांचा समावेश आहे.

गेल्या 5 वर्षांच्या चक्रात (2018 ते 2023) BCCI ला स्टार इंडियाकडून 94 लाख 40 कोटी (सुमारे 6138 कोटी रुपये) मिळाले. ज्यात प्रति सामन्यासाठी (डिजिटल आणि टीव्ही) 60 कोटी रुपयांचा करार झाला होता. यावेळी बीसीसीआय डिजिटल आणि टीव्हीचे हक्क स्वतंत्रपणे विकणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे. (BCCI Home Media Rights)

भारतीय बोर्ड सर्वाधिक बोली लावणाऱ्याशी करार करेल

बीसीसीआयने आयपीएल दरम्यान मीडिया अधिकारांमधून 48,390 कोटी रुपये कमावले, ज्यामध्ये डिजिटल अधिकार रिलायन्सने आणि टीव्ही अधिकार स्टार टीव्हीने विकत घेतले. लिलाव प्रक्रिया आयपीएलप्रमाणेच ई-लिलावाद्वारे पूर्ण केली जाईल. या व्यवसायाशी संबंधित एका ब्रॉडकास्टरचे मत आहे की आत्ताच आकडा देणे कठीण आहे परंतु डॉलर आणि रुपयाचे गुणोत्तर देखील गेल्या वेळेच्या तुलनेत बदलले आहे. पण डिजिटल अधिकार टीव्ही अधिकारांपेक्षा जास्त पैसे मिळवू शकतात. (BCCI Home Media Rights)

डिस्ने, स्टार, रिलायन्स, वायाकॉम हे भारताच्या देशांतर्गत सामन्यांचे प्रमुख दावेदार असतील, अशी माहिती मिळते आहे. दरम्यान, लिलावात झी मीडिया समूह देखील बोली लावू शकेल, अशी चर्चा आहे. तीन महिन्यांनी विश्वचषक स्पर्धा होणार आहे. याचे आयोजन भारतात आहे. ही स्पर्धा जर भारत जिंकला तर जाहिरातींच्या माध्यमातून होणारी कमाई मोठी असेल. पण जर पराभव पत्करावा लागला तर कमाईवर परिणाम होईल, असे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news