MLC 2023 | मुंबई इंडियन्सचा अमेरिकेत डंका; सुपर किंग्जचा पराभव करत गाठली अंतिम फेरी

MLC 2023 | मुंबई इंडियन्सचा अमेरिकेत डंका; सुपर किंग्जचा पराभव करत गाठली अंतिम फेरी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या टी-२० क्रिकेटचे वारे जगभरात वाहत आहे. जगभरात टी-२० क्रिकेटच्या अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. जसे भारताची आयपीएल, ऑस्ट्रेलियाची बीबीएल, पाकिस्तानची पीएसएल. याप्रमाणे अमेरिकेतही मेजर लीग क्रिकेट (MLC 2023) सुरू आहे. या लीगमधील कालचा सामना (दि.२८) एमआय न्यूयॉर्क विरुद्ध टेक्सास सुपर किंग्ज यांच्यात झाला. या सामन्यात चुरशीची लढाई झाली. यात एमआय न्यूयॉर्कने ६ विकेटनी विजय मिळवला. मुंबई इंडियन्सकडून टिम डेव्हिड आणि डेवाल्ड ब्रेविस यांनी शानदार फलंदाजी केली. या विजयासह मुंबईने स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. (MLC 2023)

सामन्याच्या सुरूवातीला एमआय न्यूयॉर्कचा कर्णधार निकोलस पूरनने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना १५८ धावांवर टेक्सास सुपर किंग्ज डाव गुंडाळला. टेक्सासकडून डिवॉन कॉनवेने सर्वाधिक ३८ धावा केल्या. तर मिलिंद कुमारने ३७ धावांची खेळी केली. मुंबईकडून ट्रेंट बोल्टने सर्वाधिक ४ विकेट तर टिम डेव्हिडने २ विकेट घेतल्या. एहसान आदिल आणि राशिद खान यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. (Mumbai Indians)

टेक्सासने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या एमआयची सुरूवात फार चांगली झाली नाही. ५० धावांच्या आत संघाच्या दोन विकेट पडल्या होत्या. सामना मुंबईच्या हातातून जाईल असे वाटत असताना डेवाल्ड ब्रेविस आणि टिम डेव्हिड यांनी सामन्याची सूत्रे हाती घेतली. ब्रेविसने २ षटकार आणि १ चौकारांसह नाबाद ४१ धावा केल्या तर, डेव्रिडने ४ षटकारांसह २० चेंडूत नाबाद ३३ धावांची खेळी केली. या दोघांच्या शानदार खेळीच्या जोरावर मुंबईने सामना १९व्या ओव्हरमध्ये जिंकला.

आयपीएलमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाच वेळा जेतेपदावर आपले नाव कोरले आहे. मुंबईसह चेन्नई सुपर किंग्जनेही महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वात पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहेत. मुंबईने २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० अशी पाच विजेतेपद मिळवली आहेत. तर चेन्नईने २०१०, २०११, २०१८, २०२१ आणि २०२३ अशी पाच विजेतेपद मिळवली आहेत. (MLC 2023)

हेही वाचा;

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news