West Indies vs India 1st Test LIVE :  तिसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत भारताची धावसंख्या ४ बाद ४००  | पुढारी

West Indies vs India 1st Test LIVE :  तिसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत भारताची धावसंख्या ४ बाद ४०० 

रोसेयो (डॉमिनिका); वृत्तसंस्था : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना यशस्वी जैस्वालने चांगलाच गाजवला. त्याने भारतासाठी कसोटी पदार्पण करताना शतक झळकावले. त्याच्यासोबत रोहित शर्मानेही शतकी खेळी करून आपणही फॉर्मात परतल्याचे दाखवून दिले. या दोघांच्या शतकांच्या जोरावर भारताने मजबूत स्थिती प्राप्त केली असून, तिसर्‍या दिवशी उपहाराला खेळ थांबला तेव्हा भारताच्या 4 बाद 400 धावा झाल्या होत्या. भारताकडे यावेळी 250 धावांची भक्कम आघाडी होती. शतकवीर यशस्वी जैस्वाल 171 धावांवर बाद झाला. तर विराट कोहली 72 धावांवर खेळत होता. रोहित शर्मा 103 धावा करून बाद झाला. त्याने कसोटीतील दहावे शतक झळकावले. शुभमन गिलने मात्र निराशा केली. तो 6 धावांवर बाद झाला. अजिंक्य रहाणेही अवघ्या तीन धावांत तंबूत परतला.

भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि विराट कोहली यांनी तिसर्‍या दिवशीच्या पहिल्या सत्रात आक्रमक सुरुवात केली. यशस्वी जैस्वालने आपले दीडशतक पूर्ण करून द्विशतकाकडे कूच केली. या दोघांनी तिसर्‍या विकेटसाठी शतकी भागीदारी देखील रचली. विराट कोहली आपल्या अर्धशतकाजवळ पोहोचला होता. भारताने 350 धावांचा टप्पा पार करून आपले लीड 200 धावांच्या पुढे नेले होते. सर्व फासे भारताच्या बाजूने पडत होते, मात्र अल्झारी जोसेफने यशस्वी जैस्वालला बाद करत भारताला तिसरा धक्का दिला. त्याने विराट-यशस्वीची 110 धावांची भागीदारी तोडली. याचबरोबर यशस्वी जैस्वलाचा पदार्पणाच्या कसोटीत द्विशतकी खेळी करण्याचा मनसुबा उधळून लावला. यशस्वीचे पदार्पणातच द्विशतक झळकावण्याचे स्वप्न भंगले. त्याने 387 चेंडूत 171 धावा केल्या.

याचदरम्यान, भारताचा रनमशिन विराट कोहलीने आपले 29 वे अर्धशतक पूर्ण केले असून, अजिंक्य रहाणे बाद झाल्यानंतर रवींद्र जडेजासोबत आक्रमक भागीदारी रचली. उपहाराला भारताच्या 4 बाद 400 धावा झाल्या होत्या. जडेजा यावेळी 21 धावांवर खेळत होता.
भारताने पहिल्याच दिवशी पहिल्या डावात वेस्ट इंडिजला 150 धावांत गुंडाळले.

विराटने टाकले सेहवागला मागे

विराटने कसोटी क्रिकेटमध्ये 8508* धावांचा टप्पा ओलांडून वीरेंद्र सेहवागला (8503) मागे टाकले. भारताकडून सचिन तेंडुलकर (15921), राहुल द्रविड (13265), सौरव गांगुली (10122) आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मण (8781) यांनी विराटपेक्षा कसोटीत सर्वाधिक धावा केल्या आहेत.

हेही वाचा;

Back to top button