R Ashwin : आर. अश्विनकडे भारताचा कर्णधार होण्याची पात्रता | पुढारी

R Ashwin : आर. अश्विनकडे भारताचा कर्णधार होण्याची पात्रता

चेन्नई, पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय खेळाडू दिनेश कार्तिकने अश्विनसाठी (R Ashwin) बॅटिंग करताना तो भारताच्या कर्णधारपदासाठी पात्र असल्याचे म्हटले आहे. भारतीय संघ आता वेस्ट इंडिज दौर्‍यावर जात असून, 12 जुलैपासून कसोटी मालिकेचा थरार रंगणार आहे. आगामी कसोटी मालिकेसाठी अश्विनला संघात स्थान मिळाले आहे; पण प्लेईंग इलेव्हनमध्ये तो दिसणार का? हे पाहण्याजोगे असेल. अश्विनचे (R Ashwin) कौतुक करताना कार्तिकने म्हटले की, अश्विन हा आजवर खेळलेल्या महान क्रिकेटपटूंपैकी एक आहे. मला वाटते की, तो एकदा भारताचा कर्णधार होण्यास पात्र आहे, मला विश्वास आहे की, त्याने टीम इंडियाचा कर्णधार होण्याचा अधिकार मिळवला आहे.

भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन दीर्घकाळापासून मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमधून बाहेर आहे. तो भारतीय संघासाठी अनुक्रमे जानेवारी आणि नोव्हेंबर 2022 मध्ये शेवटचा एकदिवसीय आणि टी-20 सामना खेळला. भारत यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा आयोजित करणार आहे. अश्विनला विश्वचषक संघात स्थान मिळविता आले नाही. त्याचबरोबर आशियाई क्रीडा स्पर्धा सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये हांगझोऊ येथे होणार असून, त्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आपला संघ (पुरुष आणि महिला) पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

बीसीसीआयने आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी दुसरा संघ पाठवण्याचे ठरवले आहे. त्यासाठी संघाच्या कर्णधारपदासाठी शिखर धवन व्यतिरिक्त अश्विनच्या नावाची चर्चा होती. यातच दिनेश कार्तिकला अश्विनने आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे नेतृत्व करावे, अशी इच्छा आहे.

Back to top button