Cheteshwar Pujara : माझा मुलगा कमबॅक करू शकतो; चेतेश्वर पुजाराच्या वडिलांना विश्वास | पुढारी

Cheteshwar Pujara : माझा मुलगा कमबॅक करू शकतो; चेतेश्वर पुजाराच्या वडिलांना विश्वास

बडोदा; वृत्तसंस्था : माझा मुलगा पुनरागमन करू शकतो. तो 35 वर्षांचा असला, तरी तो मानसिकद़ृष्ट्या खूप मजबूत आहे, असा विश्वास चेतेश्वर पुजारा याचे वडील अरविंद पुजारा यांनी व्यक्त केला आहे. भारतीय कसोटी संघाचा स्टार फलंदाज चेतेश्वर पुजाराला वेस्ट इंडिज दौर्‍यावरील कसोटी मालिकेतून डच्चू देण्यात आला आहे. पुजाराच्या जागी यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड या युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. (Cheteshwar Pujara)

चेतेश्वरचे वडील म्हणाले, पुजारा मानसिकद़ृष्ट्या खूप मजबूत आहे. मी त्याच्या निवडीवर भाष्य करू शकत नाही; परंतु दुलीप करंडक संघ जाहीर झाल्यानंतर तो नेटमध्ये कठोर परिश्रम घेत आहे आणि कौंटीकडूनही खेळत राहील. एक वडील आणि प्रशिक्षक या नात्याने तो पुनरागमन करू शकत नाही या अशा अनावश्यक गोष्टींवर विश्वास ठेवण्याचे कारण नाही. माझा मुलगा गेले अनेक वर्षे देशासाठी खेळला असून त्याच्यावर अशी शंका उपस्थित करणे चुकीचे आहे. (Cheteshwar Pujar)

पुजाराला वगळल्यानंतर सुनील गावसकर म्हणाले की, तो नक्कीच एक गुणी खेळाडू असून सध्या त्याचा फॉर्म खराब आहे. त्यामुळे त्याला वगळण्यात आले; मात्र रोहित आणि विराट यांचीही कामगिरी फारशी चांगली नाही. त्यामुळे जो नियम पुजाराला तोच नियम या दोघांना लागू व्हायला हवा होता.

हेही वाचा;

Back to top button