जालना : भरधाव ट्रकची मोटरसायकलला धडक, बहिण-दोन भाऊ जागीच ठार | पुढारी

जालना : भरधाव ट्रकची मोटरसायकलला धडक, बहिण-दोन भाऊ जागीच ठार

जालना, पुढारी वृत्तसेवा : शहरातील अंबड-मंठा बायपास रोडवरील उडान पुलावर आयशरनें मोटर सायकलला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार झाले.

सुट्टी असल्याने वडिलांसोबत मंठा चोफुलीवरील डीमार्टमध्ये खरेदी करण्यासाठी जात असताना भरधाव ट्रकने अन्य वाहणास ओव्हरटेक करून पुढे जातांना मोटरसायकला धडक दिली. या वेळी मोटारसायकलवर पुढे एक मुलगी आणि मागे दोन मुले बसली होती. वडिलांच्या डोळ्यादेखत तिघाही जणांचा मृत्यू झाला आहे. ट्रक अपघातस्थळी सोडून चालक फरार झाला आहे. वडील जखमी असून त्यांच्यावर जालन्यातील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा;

Back to top button