Mukesh Kumar : कसोटी खेळण्याचे स्वप्न साकार : मुकेश कुमार

Mukesh Kumar : कसोटी खेळण्याचे स्वप्न साकार : मुकेश कुमार
Published on
Updated on

कोलकाता; पीटीआय : 'कहतै है ना… अगर आप टेस्ट नही खेले तो क्या खेले?' देशासाठी कसोटी सामना खेळणे हे माझे स्वप्न होते. ते माझं स्वप्न आता सत्यात उतरताना दिसत आहे. अशा उत्कट भावना भारतीय संघात निवड झालेला पश्चिम बंगालचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमार याने व्यक्त केल्या आहेत. (Mukesh Kumar)

बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यातील कंकरकुंड या छोट्याशा खेड्यातील मुकेश कुमारचा प्रवास सोपा नव्हता. आपल्या मेहनतीने मुकेशने भारतीय संघात स्थान पटकावले आहे आणि त्याचा इथवरचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी त्याची निवड झालेली; परंतु त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. मुकेशचे वडील कोलकातामध्ये टॅक्सी चालवायचे. त्यांना त्यांच्या व्यवसायात मदत करण्यासाठी तो पहिल्यांदा कोलकात्याला गेला. मुकेशच्या वडिलांना क्रिकेटचा तिरस्कार होता आणि या खेळात नाव कमावण्यासाठी मुकेशकडे फक्त एक वर्ष होते. (Mukesh Kumar)

2008-09 मध्ये बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यात 'प्रतिभा की खोज' नावाचा कसोटी सामना आयोजित करण्यात आला होता. इथेच मुकेश कुमारच्या प्रयत्नाची सुरुवात झाली होती. 25-25 षटकांच्या सामन्यात मुकेश कुमारने सात सामन्यांत 34 बळी घेतले. स्थानिक गोपालगंज जिल्हा क्रिकेट संघाचा माजी कर्णधार अमित सिंग याने मुकेश कुमारची प्रतिभा प्रथमच पाहिली होती. तो रोज 30 किलोमीटर सायकलिंग करून क्रिकेट खेळायला यायचा. मुकेशचे गाव गोपालगंजपासून 15 किलोमीटर दूर होते. तो त्याच्या पायाचे स्नायू मजबूत करण्यासाठी खूप धावायचा. सैन्यात भरती होण्यासाठी देखील तो प्रयत्न करत होता. मुकेश कुमार 2012 मध्ये कोलकाता येथे वडिलांना टॅक्सी व्यवसायात मदत करण्यासाठी गेला.

कोलकात्यातही मुकेशने वडिलांच्या इच्छेविरुद्ध जाऊन दुसर्‍या लीगमध्ये 400-500 रुपयांत स्थानिक सामने खेळायला सुरुवात केली. 2014 मध्ये मुकेश आणखी एका कसोटी सामन्यात सामील झाला, ज्याने त्याचे आयुष्य बदलले. बंगालच्या बुची बाबू स्पर्धेसाठी मुकेश कुमारची निवड झाली तेव्हा त्याच्याकडे क्रिकेट किट देखील नव्हते. तेव्हा मनोज तिवारी यांनी त्याला बॅट, पॅड आणि हातमोजे दिले होते. 20 लाख मूळ किंमत असलेल्या मुकेश कुमारला आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सने 5.50 कोटींत संघात घेतले. मुकेशने 39 प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 149, 24 लिस्ट ए क्रिकेटमध्ये 26 आणि 33 टी-20 क्रिकेटमध्ये 32 विकेटस् घेतल्या आहेत, पण आता तो थेट राष्ट्रीय संघातून खेळणार आहे.

हेही वाचा;

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news