Cheteshwar Pujara ‘OUT’: चेतेश्वर पुजाराला कसोटी संघातून डच्चू! ‘या’ नव्या खेळाडूंना मिळाली संधी | पुढारी

Cheteshwar Pujara 'OUT': चेतेश्वर पुजाराला कसोटी संघातून डच्चू! ‘या’ नव्या खेळाडूंना मिळाली संधी

पुढारी ऑनलाईन डेस्क : Cheteshwar Pujara ‘OUT’ : भारतीय संघ (Team India) पुढील महिन्यात म्हणजे जुलैमध्ये वेस्ट इंडिज (West Indies) दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेपासून होणार असून या मालिकेसाठी भारतीय संघात अनेक मोठे बदल पाहायला मिळत आहेत. यामध्ये पहिला बदल चेतेश्वर पुजाराच्या (Cheteshwar Pujara) रूपाने झाला असून त्याला विंडिज दौऱ्याच्या कसोटी संघातून डच्चू देण्यात आला आहे.

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या विजेतेपदाने भारताला सलग दुस-यांदा हुलकावणी दिली. नुकत्याच झालेल्या अंतिम सामन्यात (WTC Final) ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा (Team India) 209 धावांनी दारुण पराभव केला. या सामन्यानंतर अनुभवी फलंदाज पुजाराची (Cheteshwar Pujara) कारकीर्द संकटात सापडल्याची चर्चा होती. त्याला अगामी विंडिज दौ-यातून वगळे जाईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. हाच अंदाज बीसीसीअयच्या निवड समितीने खरा करून दाखवला आहे. शुक्रवारी जेव्हा बीसीसीआयने संघाची घोषणा केली तेव्हा त्यात पुजाराचे नाव दिसले नाही. उलट ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जैस्वाल यांना पहिल्यांदाच कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे. (Cheteshwar Pujara OUT from team india)

डब्ल्यूटीसी फायनलच्या (WTC Final) दोन्ही डावांमध्ये पुजाराने निराशाजनक कामगिरी केली. त्याने दोन्ही डावांत अनुक्रमे केवळ 14 आणि 27 धावा केल्या. यापूर्वीच्या अनेक मालिकांमध्येही त्याची बॅट चमकदार कामगिरी करण्यात अपयशी ठरत आली आहे. अशा परिस्थितीत पुजाराचे कसोटी करिअर संकाट सापडले होते. अखेर निवडकर्त्यांनी त्याच्याकडे पाठ फिरवून त्याच्या जागी नव्या फलंदाजांन संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. (Cheteshwar Pujara OUT from team india)

रहाणे उपकर्णधार

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 फायनलमधून 18 महिन्यांनंतर टीम इंडियामध्ये पुनरागमन करणाऱ्या अजिंक्य रहाणेची पुन्हा भारताच्या टेस्ट टीमच्या उपकर्णधारपदी निवड झाली आहे. त्याने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना पुनरागमनात करत 86 आणि 48 धावा ठोकल्या. या खेळीनं केवळ त्याचं स्थान राखलं नाही तर त्याला उपकर्णधारपदीही बढती देण्यात आली. रोहित शर्मानं नजीकच्या काळात कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्यास रहाणेकडे कर्णधारपद सोपवले जाऊ शकते, असे निवडकर्त्यांनी स्पष्ट केले आहे.

Back to top button