Team India Announcement : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारताचा संघ जाहीर!

Team India Announcement : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारताचा संघ जाहीर!

पुढारी ऑनलाईन डेस्क : Team India Announcement : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय कसोटी आणि एकदिवसीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. दोन्ही फॉरमॅटमध्ये संघाचे नेतृत्व शर्माच करताना दिसणार आहे. त्याचबरोबर अजिंक्य रहाणे कसोटीत तर हार्दिक पंड्या वनडेत उपकर्णधार असतील. चेतेश्वर पुजाराला कसोटी संघातून वगळण्यात आले आहे. टीम इंडिया विंडीज दौऱ्यावर दोन कसोटी, तीन वनडे आणि पाच टी-20 सामने खेळणार आहे. या दौ-याच्या माध्यमातून भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या तिस-या पर्वाची सुरुवात करणार आहे. यासोबतच एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या तयारी करण्याची संधी टीम इंडियाला मिळणार आहे.

दरम्यान, ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल आणि वेगवान गोलंदाज मुकेश कुमार यांची कसोटी संघात एन्ट्री झाली आहे. केएस भरत आणि इशान किशन हे कसोटीत भारताचे यष्टिरक्षक असतील. मोहम्मद शमीला कसोटी आणि एकदिवसीय दोन्ही संघातून विश्रांती देण्यात आली आहे. फिरकीची मदार अश्विन, जडेजा आणि अक्षर यांच्यावर असेल. त्याचबरोबर वेगवान गोलंदाजीची जबाबदारी शार्दुल, मुकेश, सिराज, उनाडकट आणि नवदीप यांच्यावर असेल.

संजू सॅमसनचे वनडेत पुनरागमन

संजू सॅमसन आणि ऋतुराज गायकवाड यांचे वनडेत पुनरागमन झाले आहे. सॅमसनसोबत इशान किशनचाही यष्टिरक्षक म्हणून समावेश करण्यात आला आहे. याशिवाय मुकेश कुमारही छाप पाडण्यात यशस्वी ठरला आहे.

पुजाराला डच्चू

पुजाराला त्याच्या खराब फॉर्ममुळे संघातून वगळण्यात आले आहे. फेब्रुवारी 2019 पासून पुजाराने 35 कसोटी डावांमध्ये 29.98 च्या सरासरीने 1769 धावा केल्या आहेत. यात एका शतकाचा समावेश आहे.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी मालिकेचे वेळापत्रक :

12 ते 16 जुलै : पहिली कसोटी (विंडसर पार्क, डॉमिनिका)
20 ते 24 जुलै : दुसरी कसोटी (क्वीन्स पार्क ओव्हल, त्रिनिदाद)

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज वनडे मालिकेचे वेळापत्रक :

27 जुलै : पहिली वनडे (केन्सिंग्टन ओव्हल, बार्बाडोस)
29 जुलै : दुसरी वनडे (केन्सिंग्टन ओव्हल, बार्बाडोस)
1 ऑगस्ट : तिसरी वनडे (ब्रायन लारा क्रिकेट अकादमी, त्रिनिदाद)

भारताचा कसोटी संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मो. सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी.

भारत एकदिवसीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, मोहम्मद. सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news