Subaman Gill : शुभमन गिल विंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेतून बाहेर? ‘या’ खेळाडूला मिळणार संधी | पुढारी

Subaman Gill : शुभमन गिल विंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेतून बाहेर? ‘या’ खेळाडूला मिळणार संधी

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात (WTC Final) लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर टीम इंडिया (Team India) आता वेस्ट इंडिज (west indies) दौऱ्याने नव्या पर्वाची सुरुवात करणार आहे. भारतीय संघाला वेस्ट इंडिज दौऱ्यावर (team india west indies tour) 2 कसोटी, 3 वनडे आणि 5 टी-20 सामने खेळायचे आहेत. टी-20 मालिकेत पुन्हा एकदा हार्दिक पंड्याकडे (hardik pandya) कर्णधारपद सोपवले जाऊ शकते. त्याचबरोबर या मालिकेसाठी संघामध्ये युवा खेळाडूंचा भरणा करण्याकडे निवड समितीचा कल असेल. या टी-20 मालिकेत (T-20 Series) शुभमन गिल (Subaman gill) आणि यशस्वी जैस्वाल (yashasvi jaiswal) डावाची सुरुवात करताना दिसतील अशी अपेक्षा होती. पण आता गिलबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे.

गिल घेणार विश्रांती

वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत गिल (shubman gill) कसोटी आणि एकदिवसीय फॉर्मेटमध्ये खेळताना दिसणार आहे. पण अगामी आशिया चषक आणि विश्वचषक स्पर्धा लक्षात घेता गिलवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी त्याला विंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेदरम्यान विश्रांती दिली जाऊ शकते. गिलच्या अनुपस्थितीत ऋतुराज गायकवाडला (Ruturaj Gaikwad) डावाची सुरुवात करण्याची संधी मिळू शकते.

यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL) सीएसकेसाठी (CSK) सलामी देताना गायकवाडने चमकदार कामगिरी केली. आयपीएलनंतर त्याला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी राखीव खेळाडूंमध्ये स्थान देण्यात आले. मात्र त्याच्या विवाहसोळ्यामुळे या खेळाडूला संघातून वगळण्यात आले आणि त्याच्या जागी जैस्वालला संधी देण्यात आली.

बेंच स्ट्रेंथ आजमावली जाऊयाची शक्यता (shubman gill)

खेळाडूंना विश्रांतीची गरज आहे आणि मोठ्या स्पर्धा तोंडावर असल्याने बीसीसीआय काही प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्याची योजना आखत आहे. ज्यामुळे बेंच स्ट्रेंथ आजमावण्याचा प्रयत्न केला जाईल. निवड समिती जुलैच्या पहिल्या आठवड्यात वेस्ट इंडिज मालिकेसाठी खेळाडूंची निवड जाहीर करण्याची शक्यता आहे.

ईशान किशनही असू शकतो स्पर्धक

गायकवाड व्यतिरिक्त ईशान किशन (Ishan Kishan) हा देखील सलामीचा प्रबळ दावेदार आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये इशानने अनेक वेळा संघासाठी सलामी फलंदाज म्हणून भूमिका बजावली आहे. दुसरीकडे, गायकवाडला उर्वरित खेळाडूंएवढ्या संधी मिळालेल्या नाहीत. अशातच त्याला यंदाही बाहेर बसवणार की संधी दिली जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टीम इंडियाला (Team India) मागील वर्षी टी-20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होत, तेव्हापासून निवडकर्त्यांनी या फॉरमॅटच्या संघातून रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल यासारख्या मोठ्या खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यांच्या ऐवजी तरुणांना खेळण्याची संधी दिली आहे.

Back to top button