नवी दिल्ली : भारताने वर्ल्ड कपचे वेळापत्रक बनवले आहे; पण त्यामध्ये पाकिस्तानने आता खोडा घातला आहे. कारण आमचा अफगाणबरोबरचा सामना चेन्नईत खेळवण्यात येऊ नये, अशी भूमिका पाकिस्तानने घेतली आहे. भारत पाकिस्तानच्या या मागणीला वाटाण्याच्या अक्षता देण्याची शक्यता आहे. कारण सामन्याची ठिकाणे बदलण्यासाठी सुरक्षेचे ठोस कारण असावे लागते; अन्यथा वेळापत्रक आणि ठिकाणात बदल केला जात नाही. (ICC ODI WC 2023)
पाकिस्तान संघव्यवस्थापनाने बीसीसीआय आणि आयसीसीशी चर्चा करून अफगाणिस्तानविरुद्धची लढत चेन्नईऐवजी बंगळूरमध्ये, तर ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना बंगळूरऐवजी चेन्नईत खेळविण्यास सांगावे, अशा सूचनाही दिल्या आहेत. वर्ल्ड कपमधील सामन्यांची ठिकाणे बदलण्याबाबत आयसीसीचे काही नियम आहे. सुरक्षेच्या कारणास्तवच ठरलेल्या सामन्यांच्या ठिकाणांत बदल होऊ शकतात, असे आयसीसीचा नियम सांगतो. (ICC ODI WC 2023)
या स्पर्धेच्या प्रस्तावित कार्यक्रमानुसार भारत-पाकिस्तान लढत अहमदाबादला रंगणार आहे. मात्र, येथे खेळण्यास पाकिस्तान संघ जवळपास तयार आहे. मात्र, अंतिम निर्णय त्यांच्या देशातील सरकारच घेणार आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले. पाकिस्तानच्या लढती अहमदाबादसह चेन्नई, कोलकाता आणि बंगळूर येथे होतील. त्यामुळे पाकिस्तानच्या संघाता चेन्नईत सामना खेळावा लागणार, हे जवळपास स्पष्ट झाले आहे. भारत, पाकिस्तान लढत अहमदाबादला रंगणार आहे. या लढतीवर पाकिस्तानने सुरुवातीला आक्षेप घेतला होता; पण आता पाकिस्तान या ठिकाणी खेळण्यास तयार असल्याचे म्हटले जात आहे.
'आयसीसीच्या स्पर्धांच्या वेळी सामन्यांच्या ठिकाणांबद्दल सूचना, हरकती मागविणे हा आयसीसीचा नियम आहे. अन् आयसीसीच्या निर्णयात बदल करायचा असेल, तर त्याला ठोस कारण असणे अपेक्षित आहे. ते कारण आयसीसीला पटले तरच ठिकाणांत बदल होऊ शकतो', अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली.
हेही वाचा;