टीम इंडियासमाेरील वाट ‘बिकट’, WTC 2023-25 वेळापत्रक जाहीर | पुढारी

टीम इंडियासमाेरील वाट 'बिकट', WTC 2023-25 वेळापत्रक जाहीर

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे (WTC 2023-25 ) तिसरे सत्र शुक्रवारपासून ऑस्‍ट्रेलिया आ‍णि इंग्‍लंड यांच्‍यातील ॲशेस मालिकेने होईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC ) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्‍या तिसर्‍या सत्राचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यामध्‍ये भारतासमोर आव्‍हान खडतर आहे. कारण टीम इंडियाची वेस्ट इंडिजसोबतच कसाेटीतील बलाढ्य ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका दाैर्‍यात ‘कसोटी’ लागणार आहे. या तिन्‍ही देशांमधील होणार्‍या कसोटी मालिकेवरच टीम इंडियाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्‍या फायनलचे तिकिट निश्‍चित होणार आहे.

WTC 2023-25 : प्रत्येक संघाला खेळाव्‍या लागणार ६ मालिका

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्‍पर्धेचे सध्‍याचे स्‍वरुप कायम ठेवले आहे. या स्‍पर्धेत ९ संघ असतील. नवीन वेळापत्रकानुसार
प्रत्‍येक संघ दोन वर्षांच्‍या कालावधीत घरच्‍या मैदानावर तीन तर विदेशात तीन कसोटी मालिका खेळतील. यातून गुणतालिकेत अव्‍वल असणारे दोन संघ अंतिम सामन्‍यासाठी आमने-सामने असतील.

विदेशातील मालिकांमध्‍ये टीम इंडियाची लागणार ‘कसाेटी’

टीम इंडिया आगामी दोन कसोटी सामने वेस्ट इंडिजमध्‍ये खेळेल. डॉमिनिका आणि त्रिनिदाद येथे हे सामने होतील. टीम इंडिया वेस्ट इंडिजसोबतच ऑस्ट्रेलिया (पाच कसोटी) आणि दक्षिण आफ्रिके (दोन कसोटी) विरुद्ध मालिका खेळणार आहे. तर न्‍यूझीलंड, इंग्‍लंड आणि बांगलादेश संघाविरोधात टीम इंडिया मायदेशात खेळेल. कसोटी क्रिकेटमध्‍ये बलाढ्या मानल्‍या जाणार्‍या ऑस्‍ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका दाैरा टीम इंडियासाठी खडतर असेल, असे मानले जात आहे.

ॲशेस मालिकेने होईल WTC 2023-25 स्‍पर्धेला प्रारंभ

WTC तिसर्‍या सत्राचा प्रारंभ ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील बहुप्रतीक्षित ॲशेस मालिकेने होईल. या मालिकेत पाच सामने होतील. पहिला सामना शुक्रवारपासून बर्मिंगहॅम येथे खेळवला जाईल. त्यानंतर लॉर्ड्स, लीड्स, मँचेस्टर आणि ओव्हल येथे सामने होणार आहेत.वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे तिसरे सत्रात ऑस्‍ट्रेलियाचा संघ ९ सामने खेळेल. ऑस्‍ट्रेलिया मायदेशात भारत, पाकिस्‍तान आणि वेस्‍ट इंडिज विरुद्ध कसोटी मालिका खेळेल. तर इंग्‍लंड, न्यूझीलंड आणि श्रीलंकेविरुद्धच्या मालिका यजमान म्‍हणून खेळणार आहे. ऑस्‍ट्रेलिया संघ भारताविरुद्ध पाच, पाकिस्तानविरुद्ध तीन आणि वेस्ट इंडिजविरुद्ध दोन असे एकूण १० कसोटी सामने मायदेशात खेळणार आहे.

इंग्लंड

इंग्‍लंड यंदा १० कसोटी सामने मायदेशात खेळणार आहे. इंग्‍लंडचा संघ ऑस्‍ट्रेलिया, वेस्‍टइंडिज आणि श्रीलंका संघाविरोधात मायदेशात कसोटी मालिका खेळेल. तर भारताविरुद्ध पाच, पाकिस्तानविरुद्ध तीन आणि न्यूझीलंडविरुद्ध तीन सामने यजमान म्‍हणून खेळणार आहेत.

दक्षिण आफ्रिका

आयसीसीच्‍या वेळापत्रकात दक्षिण आफ्रिकेच्या संघाला सर्वोत्तम वेळापत्रक मिळाले आहे. पाकिस्तान, श्रीलंका आणि भारत या तीन आशियाई संघांविरोधात मायदेशात खेळतील. न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि बांगलादेशमध्ये कसोटी मालिका खेळणार आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button