Najmul Hossain : नजमूलचे शतक; बांगला देश 5 बाद 362

Najmul Hossain : नजमूलचे शतक; बांगला देश 5 बाद 362

Published on

ढाका; वृत्तसंस्था : नजमूल होसेनने आपल्या कारकिर्दीतील तिसरे शतक झळकावल्यानंतर बांगला देशने झगडणार्‍या अफगाणिस्तानविरुद्ध एकमेव कसोटी सामन्यात पहिल्या दिवसअखेर 5 बाद 362 धावांपर्यंत मजल मारली. उत्तम बहरात असलेल्या नजमूलने 175 चेंडूंचा सामना करत 146 धावांची शानदार खेळी साकारली. 76 धावांच्या खेळीसह महमुदुल हसनने त्याला उत्तम साथ दिली. हसनचे हे कारकिर्दीतील तिसरे कसोटी अर्धशतक ठरले. या जोडीने दुसर्‍या गड्यासाठी 212 धावांची भागीदारी साकारत संघाला दमदार सुरुवात करून दिली. दिवसअखेर मुशफिकूर रहीम 41 तर मेहदी हसन मिराज 43 धावांवर नाबाद राहिले. अंधूक प्रकाशामुळे 11 षटके बाकी असतानाच दिवसभराचा खेळ थांबवण्यात आला. (Najmul Hossain)

अफगाणचा संघ या लढतीत अष्टपैलू राशिद खानच्या गैरहजेरीत खेळत असून त्याची संघाला प्रकर्षाने उणीव जाणवत असल्याचे पहिल्या दिवशी स्पष्ट झाले. शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवरील हिरवळीच्या विकेटवर त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. अफगाणतर्फे पदार्पणवीर मध्यमगती गोलंदाज निजत मसूद सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 67 धावांत 2 बळी घेतले. यादरम्यान त्याने दुसर्‍या षटकातील पहिल्याच चेंडूवर झाकीर हसनला बाद करत कसोटी कारकिर्दीतील आपला पहिला बळी साजरा केला. (Najmul Hossain)

हेही वाचा;

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news