Venus Williams : पुनरागमन करणार्‍या व्हीनस विल्यम्सला पराभवाचा धक्का | पुढारी

Venus Williams : पुनरागमन करणार्‍या व्हीनस विल्यम्सला पराभवाचा धक्का

रोस्मलेन; वृत्तसंस्था : दुखापतीमुळे तब्बल पाच महिने कोर्टबाहेर राहिलेल्या व्हीनस विल्यम्सने लिबेमा ओपन ग्रासकोर्ट स्पर्धेच्या माध्यमातून पुनरागमन जरूर केले. पण, पहिल्याच फेरीतील लढतीत तिला स्वित्झर्लंडची टिनेजर खेळाडू सिलेनकडून तीन सेटस्मध्येच पराभवाचा सामना करावा लागला. (Venus Williams)

व्हीनसची भगिनी सेरेना या लढतीला आवर्जून प्रेक्षकांच्या गॅलरीत हजर राहिली होती. व्हीनसने प्रारंभी आश्वासक खेळ साकारला. मात्र, त्यानंतर अचानक तिचा खेळ ढेपाळला आणि सिलेनने 3-6, 7-6 (6-3) 6-2 अशा फरकाने पिछाडी भरून काढत विजय मिळवला. 17 वर्षीय सिलेनने 2 तास 18 मिनिटांच्या खेळात व्हीनसला जेरीस आणले. (Venus Williams)

मला व्हीनसविरुद्ध खेळण्याची संधी मिळेल, असे स्वप्नातही वाटले नव्हते, असे स्वित्झर्लंडची युवा खेळाडू सिलेन याप्रसंगी म्हणाली. व्हीनस अव्वल खेळाडू आणि कोणासाठीही रोल मॉडेल आहे, याचा तिने पुढे उल्लेख केला. आजवर 7 ग्रँडस्लॅम जिंकणार्‍या व्हीनसला या स्पर्धेसाठी वाईल्डकार्ड मिळाले होते.

ऑकलंडमध्ये धोंडशिरेची दुखापत झाल्यानंतर तिला व्यावसायिक टेनिसमधून ब—ेक घ्यावा लागला होता. तिला ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅममध्येही खेळता आले नव्हते. व्हीनसने ग्रासकोर्ट ग्रँडस्लॅममधील आपले शेवटचे जेतेपद 2008 मध्ये मिळवले असून त्यानंतर तिची पाटी कोरीच राहिली आहे. यंदाची विम्बल्डन स्पर्धा दि. 3 जुलैपासून खेळवली जाणार आहे.

हेही वाचा; 

Back to top button