WTC Final IND vs AUS : पहिल्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाच्या ३ बाद ३२७ धावा | पुढारी

WTC Final IND vs AUS : पहिल्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाच्या ३ बाद ३२७ धावा

पुढारी ऑनलाईन डेस्क : wtc final : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 चा अंतिम सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगला आहे. दोन्ही संघ ही ट्रॉफी जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरले आहेत. दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसअखेर ३ विकेट्स गमावत ३२७ धावा केल्या आहेत. डेव्हिड वॉर्नर आणि लाबुशेन बाद झाल्यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि ट्रायव्हस हेडने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला आहे.

ऑस्ट्रेलियाकडून, डेव्हिड वॉर्नर ६० चेंडूमध्ये ४३ धावा, मार्नस लाबुशेन ६२ चेंडूमध्ये २६ धावा, स्टीव्ह स्मिथ  २२७ चेंडूमध्ये ९५ धावा (नाबाद) आणि आणि ट्रायव्हस हेड १५६ चेंडूमध्ये १४६ धावा (नाबाद) केल्या. भारताकडून मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूरने प्रत्येकी १ विकेट पटकावली.

ट्रायवस हेडचे दमदार अर्धशतक

ट्रायव्हस हेडने ६२ चेंडूमध्ये ५२ धावा करत अर्धशतक झळकावले.

ऑस्ट्रेलियाने ओलांडला १०० धावांचा टप्पा

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३५ षटकात ३ बाद १२० धावा केल्या आहेत. स्टीव्ह स्मिथ १५ आणि ट्रॅव्हिस हेड ३१ धावा करून ऑस्ट्रेलियाचा डाव सावरत आहेत. उस्मान ख्वाजा, डेव्हिड वॉर्नर आणि मार्नस लबुशेन पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत.

ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का, मार्नस लाबुशेन बाद

मोहम्मद शमीने मार्नस लाबुशेनला बाद केले. लाबुशेन २६ धावा करुन तंबूत परतला.

ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का, डेव्हिड वॉर्नर बाद

शार्दुल ठाकूरने ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का दिला. त्याने डेव्हिड वॉर्नरला बाद केले. डेव्हिड वॉर्नर ४३ धावा करत तंबूत परतला.

ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का, उस्मान ख्वाजा बाद

मोहम्मद सिराजने ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. त्याने उस्मान ख्वाजाला बाद केले. ख्वाजाला भोपळाही फोडता आला नाही.

भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, श्रीकर भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलियाचा संघ :

डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड.

Back to top button