

पुढारी ऑनलाईन डेस्क : WTC Final : कसोटी विश्वविजेतेपदासाठी आजपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लढत रंगणार आहे. ओव्हलच्या मैदानावर दोन्ही संघ आमने-सामने येतील. या सामन्यात अनेक मोठे खेळाडू भाग घेणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते एकमेकांना भिडत आहेत. पुन्हा एकदा हे खेळाडू एकमेकांशी स्पर्धा करतील. या संघर्षातूनच जगाला कसोटीचा नवा चॅम्पियन मिळणार आहे.
भारताचा मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स यांच्यात नेहमीच जोरदार स्पर्धा असते. पण यात कांगारूंच्या गोलंदाने अनेकवेळा बाजी मारली आहे. कमिन्सने आतापर्यंत सातवेळा 7 वेळा पुजाराची शिकार केली आहे. यादरम्यान पुजाराला कमिन्सविरुद्ध 600 चेंडूत केवळ 172 धावा करता आल्या आहेत.
अश्विनविरुद्ध लॅब्रेशनची सरासरी 63 आहे. भारतीय फिरकीपटूने कांगारू फलंदाजाला 3 वेळा बाद केले. यादरम्यान लॅबुशेनने अश्विन विरुद्ध 347 चेंडूत 190 धावा केल्या आहेत.
मोहम्मद शमीविरुद्ध डेव्हिड वॉर्नरचा स्ट्राइक रेट 81 असून त्याने 100 चेंडूत 81 धावा केल्या आहेत. शमीनेही दोनदा वॉर्नची विकेट घेतली आहे. डब्ल्यूटीसीच्या फायनलमध्ये शमी नव्या चेंडूने वॉर्नरला आव्हान देईल.
मिचेल स्टार्कने अद्याप रोहित शर्माला कसोटीत आऊट केलेले नाही. रोहितने त्याच्याविरुद्ध 151 चेंडूत 95 धावा केल्या आहेत.
रवींद्र जडेजाने स्मिथला 674 चेंडूत 7 वेळा बाद केले आहे. यादरम्यान ऑस्ट्रेलियन फलंदाजाने 33 च्या सरासरीने 232 धावा केल्या आहेत.
नॅथन लायनने 1002 चेंडूत विराट कोहलीला 7 वेळा बाद केले आहे. तर कोहलीने कंगारू फिरकीपटूच्या विरुद्ध 73 च्या सरासरीने 511 धावा केल्या आहेत.