Team India New Jersey Video : भारतीय संघाची नवी जर्सी पाहिलीत का? | पुढारी

Team India New Jersey Video : भारतीय संघाची नवी जर्सी पाहिलीत का?

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय संघांची नवी जर्सी प्रायोजक Adidas ने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटसाठी जारी केली आहे. भारतीय संघाच्या नव्या जर्सीवर खांद्याजवळ तीन पट्ट्या ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे नवी जर्सी जुन्या जर्सीपेक्षा वेगळी दिसत आहे. आता भारतीय संघ ही नवी जर्सी परिधान करून मैदानात उतरणार आहे. याबाबतचा एक व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर भारतीय संघाने आणि Adidas ने शेअर केला आहे. (Team India New Jersey Video)
भारतीय संघाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिन्ही फॉरमॅटची जर्सी दिसत आहे. टेस्ट क्रिकेटसाठी पाढऱ्या रंदाची जर्सी असून निळ्या रंगात भारताचे नाव असणार आहे. शिवाय खांद्यावर दोन्ही बाजूला निळ्या रंगाच्या पट्ट्या असणार आहेत. छातीवर डाव्या बाजूला निळ्या रंगाच्या पट्ट्या आहेत. ज्या खालून वरती वाढत जात आहेत. तर एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटसाठी निळ्या रंगाची जर्सी आहे. यातील एका फॉरमॅटसाठी गडद निळ्या रंगाची तर दुसरी फिक्कट रंगाची आहे. दरम्यान, यापैकी वन डे साठी कोणती आणि टी २० कोणती हे अद्याप सांगण्यात आलेले नाही. (Team India New Jersey Video).
Adidas पूर्वी किलर जीन्स आणि त्यापूर्वी एमपीएल भारतीय जर्सीचा स्पॉन्सर होता. Adidas २०२८ पर्यंत भारतीय संघाच्या जर्सीसाठी स्पॉन्सर असणार आहेत. यासाठी Adidas ला प्रत्येक सामन्यासाठी बीसीसीआयला ७५ लाख रुपये द्यावे लागणार आहेत. याशिवाय भारताच्या महिला आणि अंडर १९ संघासाठी देखील Adidas जर्सी बनवणार आहे. (Team India New Jersey Video)

हेही वाचलंत का?

Back to top button