Dhoni IPL New Records : एमएस धोनीचे धोनीचे अनोखे त्रिशतक! IPL मध्ये रचला इतिहास | पुढारी

Dhoni IPL New Records : एमएस धोनीचे धोनीचे अनोखे त्रिशतक! IPL मध्ये रचला इतिहास

पुढारी ऑनलाईन डेस्क : Dhoni IPL New Records : चेन्नई सुपर किंग्जने सोमवारी आयपीएलच्या फायनलमध्ये गुजरात टायटन्सवर 5 गडी राखून रोमांचक विजय मिळवला. याचबरोबर धोनीच्या नेतृत्वाखालील सीएसकेने पाचव्यांदा आयपीएलच्या विजेतेपदावर नाव कोरून मुंबई इंडियन्सची बरोबरी साधली. दरम्यान, या सामन्यात धोनीने एक स्टम्पिंग आणि एक कॅच पकडून एका अनोख्या विक्रमाला गवसणी घातली.

धोनीच्या टी-20 मध्ये 300 विकेट्स

धोनीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर फलंदाजीस मैदानात उतरलेल्या गुजरात टायटन्सच्या शुबमन गिल आणि वृद्धिमान साहा यांनी संघासाठी ताबडतोड सुरुवात करून दिली. दोघांनी अर्धशतकी सलामी देत पॉवरप्लेच्या षटकांमध्ये सीएसकेच्या गोलंदाजांची कुटाई केली. ही जोडी फोडण्यासाठी अखेर धोनीला जडेजाच्या हाती चेंडू सोपवाला लागला. जड्डूनेही कर्णधाराचा आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवून सातव्या षटकाच्या सहाव्या चेंडूवर गिलला चकवा दिला. याचा फायदा विकेटच्या मागे असणा-या धोनीने घेत क्षणार्धात गिलच्या स्टम्पिंगद्वारे दांड्या गुल केल्या. याचबरोबर भारताच्या माजी विश्वविजेत्या कर्णधाराने टी-20 करियरमध्ये 300 बळी घेण्याचा पराक्रम केला. (Dhoni IPL New Records)

यासह, धोनीने आयपीएल फायनलमध्ये ऑरेंज कॅप विजेत्या खेळाडूचे दुसऱ्यांदा स्टंम्पिंग करून तंबूचा रस्ता दाखवला आहे. यापूर्वी 2018 च्या आयपीएल फायनलमध्ये धोनीने सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनला स्टंम्पिंग करून माघारी धाडले होते. त्यावेळी विल्यमसनच्या डोक्यावर ऑरेंज कॅप होती. त्याचबरोबर धोनी हा एकमेव भारतीय यष्टीरक्षक आहे ज्याने आयपीएलच्या अंतिम सामन्यात 8 बळी घेतले आहेत. यानंतर सर्व भारतीय यष्टीरक्षकांनी मिळून 6 विकेट घेतल्या आहेत.

धोनीचे नवे विक्रम (Dhoni IPL New Records)

  • 300 बळी घेणारा पहिला भारतीय विकेटकीपर
  • आयपीएल फायनलमध्ये ऑरेंज कॅपच्या दोन खेळाडूंचे स्टंम्पिंग
  • IPL फायनलमध्ये 8 बाद घेणारा धोनी पहिला भारतीय विकेटकीपर
  • आयपीएल फायनलमध्ये दोन स्टंपिंग करणारा तो दुसरा विकेटकीपर ठरला. यात अॅडम गिलख्रिस्ट पहिल्या स्थानावर आहे.
  • धोनीने आयपीएलमधील 250 वा सामना खेळला. लीगच्या इतिहासातील तो सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू ठरला.

300 बळी घेणारा पहिला विकेटकीपर

टी-20 क्रिकेटमध्ये 300 हून अधिक बळी घेणारा धोनी पहिला भारतीय विकेटकीपर ठरला आहे. सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत कायरॉन पोलार्डने 345 बळी घेतले आहेत. महेंद्रसिंग धोनी दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने आतापर्यंत 300 विकेट्स घेतल्या आहेत. दिनेश कार्तिकने टी-20 क्रिकेटमध्ये 296 विकेट घेतल्या आहेत. त्यानंतर डेव्हिड मिलर आणि कामरान अकमल यांचा क्रमांक लागतो. दोघांनी 274 मारले आहेत. क्विटन डिकॉकने आपल्या नावावर 272 हत्या केल्या आहेत. (Dhoni IPL New Records)

‘या’ विक्रमातही धोनी नंबर-1

धोनी आयपीएलचे जेतेपद पटकावणारा सर्वात वयस्कर क्रिकेटर बनला आहे. त्याने वयाच्या 41 वर्षे 326 दिवसांत आयपीएल 2023 चे विजेतेपद पटकावले आहे. याबाबतीत धोनीने स्वतःचाच विक्रम मोडीत काढाला आहे. 2021 मध्ये, धोनी आयपीएलचे विजेतेपद जिंकणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला. तेव्हा त्यांचे वय 40 वर्षे 100 दिवस होते. आयपीएलचे जेतेपद पटकावणाऱ्या सर्वात वयस्कर खेळाडूंच्या यादीत शेन वॉर्न तिसऱ्या स्थानावर आहे. शेन वॉर्नने 2008 मध्ये 38 वर्षे 262 दिवसांचे असताना आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते.

IPL विजेतेपद पटकावणारे सर्वात वयस्कर क्रिकेटपटू

  • 41 वर्षे 327 दिवस : एमएस धोनी, (सीएसके-2023)
  • 40 वर्षे 100 दिवस : एमएस धोनी, (सीएसके-2021)
  • 38 वर्षे 262 दिवस : शेन वॉर्न, (राजस्थान रॉयल्स-2008)
  • 38 वर्षे 178 दिवस : मॅथ्यू हेडन, (सीएसके-2010)
  • 38 वर्षे 8 दिवस : मुथय्या मुरलीधरन, (सीएसके-2010)
  • 38 वर्षे 8 दिवस : ड्वेन ब्राव्हो, (सीएसके-2021)

Back to top button