

पुढारी ऑनलाईन डेस्क : यंदा आयपीएलच्या हंगामातील अंतिम सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रविवारी (दि.२८) खेळवला जाणार आहे. हा सामना गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. दरम्यान, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे टॉसला विलंब झाला आहे. वास्तविक टॉस ७. वा होणे अपेक्षित होते. मात्र, पावसामुळे टॉसला विलंब झाला आहे. आता सामन्याचे काय होणार? याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधले आहे. जाणून घेऊया फायनलसाठी असणाऱ्या पर्यायाविषयी …