पुढारी ऑनलाईन डेस्क : यंदा आयपीएलच्या हंगामातील अंतिम सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रविवारी (दि.२८) खेळवला जाणार आहे. हा सामना गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. या सामन्याआधी गुजरात सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावून चेन्नई आणि मुंबई्च्या विक्रमाशी बरोबरी करणार की, चेन्नई विजेतेपद पटकावून पाचव्यांदा मुंबईच्या विक्रमाशी बरोबरी करणार अशा चर्चांनी जोर धरला आहे. ( IPL final 2023 ) जाणून घेवूया आयपीएलमध्ये आतापर्यंत चेन्नई संघाची फायनलमधील कामगिरी…
२००८ मध्ये पहिल्या आयपीएल ट्रॉफीवर ऑस्ट्रेलियाचा जगविख्यात फिरकीपटू शेन वॉर्न याच्या नेतृत्त्वाखालील राजस्थान रॉयल्स संघाने आपली मोहर उमटवली होती. या सामन्यात प्रथम फलंदाजी करतान चेन्न्ईने राजस्थानला विजयासाठी १६३ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान राजस्थानने निर्धारित २० ओव्हरमध्ये ७ विकेट गमावून पार केले होते. सामन्यात चेन्नईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानच्या युसूफ पठाणने अर्धशतकी खेळी केली होती. (IPL)
२०१० साली झालेल्या आयपीएलच्या तिसऱ्या हंगामावर धोनीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या चेन्नईने विजेतेपदाला गवसणी घातली होती. या हंगामाच्या फायनलमध्ये चेन्नईला सचिन तेंडूलकरच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने आव्हान दिले होते. या सामन्यात मुंबईचा २२ धावांनी पराभव करत चेन्नईने पहिल्या विजेतेपदाला गवसणी घातली. (IPL)
२०११ साली झालेल्या आयपीएल हंगामावर चेन्नईने सलग दुसऱ्यांदा विजेतेपद मोहर उमटवली. या हंगामाच्या फायनलमध्ये इंग्लंडच्या इओन मॉर्गनच्या नेतृत्वात खेळवणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सनी चेन्नईला आव्हान दिले होते. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नईच्या फाफ डु प्लेसिस केलेल्या ८६ धावाच्या खेळीने कोलकाताला विजयासाठी १९३ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाता निर्धारीत २० ओव्हरमध्ये १६५ धावांच करू शकला. यासह चेन्नईने सलग दुसऱ्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते.
२०१२ साली झालेल्या आयपीएलच्या पाचव्या हंगामाचे गौतम गंभीरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सने विजेतेपद पटकावले. या हंगामाच्या फायनलमध्ये कोलकाताला धोनीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या चेन्नईने आव्हान दिले होते. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत चेन्नईने कोलकाताला विजयसाठी १९१ धावांचे आव्हान दिले होते. यामध्ये चेन्नईच्या मायकल हसी आणि सुरेश रैना यांनी अर्धशतकी खेळी केली होती. हे आव्हान कोलकाताने ५ विकेट राखून पार केले. यामध्ये मविंदर बिस्ला आणि द. आफ्रिकेच्या जॅक कॅलिसने केलेल्या तुफानी अर्धशतकी खेळाच्या जोरावर १९.४ ओव्हरमध्ये हे आव्हान पार केले.
२०१३ साली झालेल्या आयपीएलच्या सहाव्या हंगामात रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने पहिल्यांदा विजेतेपद पटकावले. यावेळी झालेल्या फायनलमध्ये मुंबईला धोनीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या चेन्नईचे आव्हान होते. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईने चेन्नईला १४८ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला १२५ धावांच करता आल्या. यासह मुंबईने २३ धावांनी सामना जिंकत पहिल्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले.
२०१५ साली झालेल्या आयपीएलच्या आठव्या हंगामामध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने बाजी मारत दुसऱ्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले. यावेळी फायनलमध्ये मुंबईला धोनीच्या नेतृत्वातील चेन्नईने आव्हान दिले होते. फायनल सामन्यात मुंबईच्या सिमन्स आणि रोहित शर्मा यांनी केलेल्या अर्धशतकी खेळीमुळे चेन्नईला २०३ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईचा संघ निर्धारीत २० ओव्हरमध्ये १६१ धावांपर्यंतच मजल मारू शकला.
२०१८ साली झालेल्या आयपीएलच्या अकराव्या हंगामात महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जने आयपीएलचे विजेतेपद पटकावले. स्पर्धेच्या फायनलमध्ये न्यूझीलंड्च्या केन विल्यमसनच्या नेतृत्वात खेळणाऱ्या सनरायजर्स हैदराबादने आव्हान दिले होते. सामन्यात चेन्नईने हैदराबादला विजयासाठी १८१ धावाचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादला १७८ धावांच करता आल्या.
२०१९ साली झालेल्या आयपीएच्या बाराव्या हंगामात रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने स्पर्धा जिंकली. या हंगामाच्या फायनलमध्ये मुंबईला महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जने आव्हान दिले होते. फायनल सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना मुंबईने चेन्नईला १४९ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला १४८ धावा करता आल्या. यासह मुंबईने सामन्यात अवघ्या एका धावाने विजय मिळवला.
२०२१ साली झालेल्या आयपीएल हंगामाचा विजेता चेन्नई सुपर किंग्ज ठरला. यावेळी चेन्नईचे नेतृत्व धोनी करत होता. स्पर्धेच्या फायनलमध्ये इओन मोर्गनच्या नेतृत्वात खेळणाऱ्या कोलकाताने आव्हान दिले होते. या सामन्यात चेन्नईने कोलकाताचा २७ धावांनी पराभव केला होता.
आजवर आयपीएल फायनलमध्ये सर्वाधिकवेळा धडक मारण्याची कामगिरी चेन्नई संघाने केली आहे. मात्र आज विजेतेपद पटकावून पाचव्यांदा आयपीएल ट्राॅफी पटकावत मुंबईच्या विक्रमाशी बरोबरी करणार का याकडे चेन्नइईच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.