Shubman Gill : शुभमनची ‘विराट’ विक्रमाशी बरोबरी | पुढारी

Shubman Gill : शुभमनची ‘विराट’ विक्रमाशी बरोबरी

अहमदाबाद; वृत्तसंस्था : शुभमन गिलने इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये तिसर्‍या शतकाची नोंद करून गुजरात टायटन्सला फायलनमध्ये प्रवेश मिळवून दिला. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर शुभमन गिलने मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची धुलाई केली. या शतकासह गिलने अनेक विक्रमांची नोंद केली; परंतु विराट कोहलीचा एक अविश्वसनीय विक्रमही आता गिलच्या नावावर नोंदवला गेला आहे. गिलने 2023 हे वर्ष गाजवले आहे. कसोटी क्रिकेट, टी-20 क्रिकेटमध्ये शतक आणि वन डे क्रिकेटमध्ये द्विशतक त्याने यंदा झळकावले आहे. (Shubman Gill)

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात गिलने फॉर्म कायम राखताना गुजरातच्या घरच्या मैदानावर 500+ धावा करण्याचा पराक्रम केला. आयपीएलच्या एका पर्वात तीन किंवा त्यापेक्षा अधिक शतक झळकावणारा तो विराट कोहलीनंतर (2016) दुसरा भारतीय ठरला. विराटने 2016 मध्ये चार शतके झळकावली होती. 2022 मध्ये जोस बटलरने 4 शतके झळकावून विराटच्या विक्रमाशी बरोबरी केली. शिवाय विराट नंतर (973) आयपीएलच्या एका पर्वात 800+ धावा करणारा गिल हा दुसरा भारतीय आहे. याही विक्रमात जोस बटलर (863 धावा, 2022) दुसर्‍या क्रमांकावर आहे. (Shubman Gill)

गिलने या सामन्यात 60 धावांत 8 षटकार व 4 चौकारांच्या मदतीने 129 धावांची खेळी केली. कॅलेंडर वर्षात टी-20 मध्ये 1000+ धावा करणारा तो विराटनंतर दुसरा वेगवान भारतीय फलंदाज ठरला. विराटने 2016 मध्ये 18 इनिंग्जमध्ये हा पराक्रम केला होता, तर गिलने यंदा 22 इनिंग्जमध्ये हा टप्पा ओलांडला.

हेही वाचा; 

Back to top button