IPL फायनलपूर्वीच गुजरात संघ वादाच्या भोवऱ्यात; जाणून घ्या काय आहे प्रकरण? | पुढारी

IPL फायनलपूर्वीच गुजरात संघ वादाच्या भोवऱ्यात; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल आता अंतिम टप्प्यात असून स्पर्धेचा केवळ शेवटचा सामना बाकी आहे. उद्या (दि.28) महेद्रसिंह धोनी याच्या नेतृत्त्वाखालील चेन्नई सुपरकिंग्ज संघ हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्सशी भिडणार आहे. पण या बहुचर्चित सामन्यापूर्वीच गुजरात टायटन्स संघ एका वादाच्या भोवऱ्यात सापडला असून संघाविरूद्ध केस दाखल करण्यात आल्याचे सामोर आले आहे.

आयपीएल सामन्याच्या ब्रेक दरम्यान गुजरात संघाकडून ‘हॅलो मारो संभालो’ आणि ‘मारा पलावो’ ही दोन गाणी वाजवण्यात आली होती. हा आनंद साजरा करणे गुजरात टायटन्सला महागात पडले आहे. या प्रकाराची केंद्र सरकारच्या कॉपीराइट सोसायटीने दखल घेतली आहे. या प्रकरणी फ्रँचायझी विरुद्ध गांधीनगर कोर्टात कॉपीराइटचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन करून आयपीएल सामन्याच्या ब्रेकदरम्यान गुजराती गाणी वाजवल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत फ्रँचायझीला नोटीस पाठवण्यात आली होती. पण त्यानंतरही या सामान्यांच्या ब्रेक दरम्यान सदरची गुजराती गाणी वाजवणे बंद केले नाही, असे कोर्टात दाखल करण्यात आलेल्या दाव्यात म्हटले आहे.

दरम्यान, न्यायालयाने गुजरात टायटन्सला या प्रकरणी समन्स पाठवले आहे. त्यावर संघाच्या वकिलांनी बाजू मांडत, आता आयपीएलमधील गुजरात टायटन्सच्या सामन्याच्या ब्रेकवेळी ‘हॅलो मारो संभालो’ आणि ‘मारा पलावो’ ही दोन गुजराती गाणी वाजवली जाणार नाहीत, असे सांगितले आहे.

हेही वाचा : 

Back to top button