IPL 2023 GT vs MI Qualifier 2 : पराभवानंतर ‘मुंबई इंडियन्‍स’ तुफान ट्रोल, शुभमनमुळेच ‘प्‍ले-ऑफ’मध्‍ये, त्‍याच्‍यामुळेच… | पुढारी

IPL 2023 GT vs MI Qualifier 2 : पराभवानंतर 'मुंबई इंडियन्‍स' तुफान ट्रोल, शुभमनमुळेच 'प्‍ले-ऑफ'मध्‍ये, त्‍याच्‍यामुळेच...

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्‍पर्धेत मुंबई इंडियन्‍सचा (Mumbai Indians) पराभव करत गुजरात टायटन्‍स ( Gujarat Titans ) संघाने दिमाखात फायनलमध्‍ये प्रवेश केला. आता आयपीएल ट्रॉफीसाठी फायलनमध्‍ये गुजरातची  चेन्‍नईशी लढत होईल. दरम्‍यान, मुंबई इंडियनचा नामुष्‍कीजनक पराभव चाहत्‍यांच्‍या चांगलाच जिव्‍हारी लागला आहे. या पराभवानंतर चाहत्‍यांकडून संघाला मोठ्या प्रमणावर ट्रोल केले जात आहे. कर्णधार रोहित शर्मासह संघाची खिल्‍ली उडवली जात आहे. त्‍याचबरोबर गुजरात संघाला फायनलमध्‍ये पोहचविण्‍याचा शिल्‍पकार ठरलेला शुभमन गिल ( Shubman Gill ) याच्‍यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ( IPL 2023 GT vs MI Qualifier 2 )

शुक्रवारी आयपीएलच्‍या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये गतविजेत्या गुजरात टायटन्सने पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा तब्‍बल ६२ धावांनी पराभव केला. या नामुष्‍कीजनक पराभवानंतर मुंबईचा या स्‍पर्धेतील प्रवास अत्‍यंत निराशाजनकरित्‍या संपला. मुंबईच्या पराभवानंतर या संघाला खूप ट्रोल केले जात आहे. सोशल मीडियावर लोक मीम्स शेअर करत आहेत. शुभमन गिल, सारा आणि सचिन तेंडुलकर यांच्याशी संबंधित मिम्सही खूप व्हायरल होत आहेत.

शुभमनच्‍या आरसीबी विरुद्‍धच्‍या खेळीमुळेच मुंबई पोहचला होता ‘प्ले -ऑफ’मध्ये

साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात गुजरात संघाने बंगळुरु चेंलेजर्सचा पराभव केला होता. बंगळुरुच्‍या पराभवामुळे मुंबई संघ प्ले-ऑफमध्ये पोहोचला होता. बंगळुरू संघाने तो सामना जिंकला असता, तर मुंबई तेव्‍हाच स्‍पर्धेतून बाहेर पडली असती. बंगळुरूविरुद्धच्या सामन्यातही शुभमनने शतक झळकावून विराट कोहलीचे शतक व्यर्थ ठरविले. आता चाहते मुंबईला ट्रोल करत आहेत की, शुभमन मुंबईचा संघ प्‍ले ऑफमध्‍ये पोहचाला आणि याच खेळाडूने मुंबईला आयपीएलमधून बाहेर काढले, असा चाहत्‍यांचा सूर आहे.

IPL 2023 GT vs MI Qualifier 2 : शुभमनची अविस्‍मरणीय आणि विक्रमी खेळी

शुक्रवारी झालेल्‍या प्‍ले-ऑफच्‍या सामन्‍यात प्रथम फलंदाजी करताना गुजरात संघाचा सलामीवीर शुभमन गिलने साई सुदर्शनसोबत १३८ धावांची भागीदारी केली. शुभमन हा ६० चेंडूत सात चौकार आणि तब्‍बल १० षटकारांच्या मदतीने १२९ धावा करून बाद झाला. गुजरात संघाने २० षटकांत ३ बाद २३३ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईचा संघ १८.२ षटकांत १७१ धावा करून सर्वबाद झाला. रोहित शर्मा ८, नेहल वढेरा ४ , कॅमेरून ग्रीन ३०, टीम डेव्हिड २, ख्रिस जॉर्डन २ धावांवर बाद झाला. मुंबईच्‍या सूर्यकुमार यादवने 38 चेंडूंत सात चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ६१ धावा केल्या तर तिलक वर्मा 14 चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ४३ धावा करून बाद झाला. गुजरातकडून मोहित शर्माने पाच विकेट घेतल्या. त्याचवेळी मोहम्मद शमी आणि राशिद खान यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. जोशुआ लिटलला एक विकेट मिळाली.

हेही वाचा : 

 

 

 

 

Back to top button