IPL 2023 Mohit sharma | सूर्याला बोल्ड करताच मोहित शर्माने जोडले हात, 'या' चेंडूने सामना फिरवला, पाहा व्हिडिओ

पुढारी ऑनलाईन डेस्क : गतविजेत्या गुजरात जायंटसने आपले विजेतेपद कायम राखण्याच्या द़ृष्टीने अंतिम पाऊल टाकले असून त्यांनी आयपीएल 2023 च्या फायनलमध्ये प्रवेश केला. शुक्रवारी झालेल्या क्वॉलिफायर-2 सामन्यात गुजरातने मुंबई इंडियन्सचा 62 धावांनी पराभव केला. गुजरातचा सलामीवीर शुभमन गिलचे शतक आणि अनुभवी वेगवान गोलंदाज मोहित शर्माच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर गुजरात संघ सामना जिंकण्यात यशस्वी ठरला. वास्तविक सूर्यकुमार यादवने धडाकेबाज खेळी केल्याने मुंबई हा सामना जिंकेल असे वाटत होते. पण मोहित शर्माने सामन्याला कलाटणी दिली.
गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 234 धावांचे आव्हान ठेवले. हे आव्हान पार करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबईकडून तिलक वर्माने धडाकेबाज खेळी करत 14 चेंडूत 43 धावा चोपल्या. तर सूर्यकुमार यादवने 61 धावांची खेळी केली. मुंबईची धावगती जबरदस्त होती. मात्र, गुजरातने मोक्याच्या क्षणी मुंबईच्या विकेटस् घेत त्यांचा डाव 171 धावात गुंडाळला. गुजरातकडून मोहित शर्माने 2.2 षटकात 5 विकेटस् घेत भेदक मारा केला. त्याने महत्त्वपूर्ण सूर्यकुमारची विकेट घेतली आणि मुंबईचा पराभव निश्चित केला. मोहित शर्माने सूर्यकुमार बोल्ड केल्याने हा सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. या सामन्यात सूर्यकुमारने 38 चेंडूत 68 धावांची खेळी केली. मोहितने चतुराईने सूर्याची लेग स्टंप उडवली. विकेट घेतल्यानंतर मोहितने विनम्रपणे हात जोडून विकेटचा आनंद साजरा केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
The dismissal that turned things back in Gujarat Titans’ favour 🙌
Mohit Sharma now has three wickets as his side inch closer to victory 👏🏻👏🏻#TATAIPL | #Qualifier2 | #GTvMI pic.twitter.com/vkEHXqZkV3
— IndianPremierLeague (@IPL) May 26, 2023
शुभनमन गिलची कमाल…
शुभमन गिलने 129 धावांची खेळी खेळली, हे गिलचे आयपीएलमधील तिसरे शतक आहे. आयपीएलच्या एका मोसमात 3 किंवा अधिक शतके करणारा गिल हा तिसरा फलंदाज आहे. आयपीएलच्या या हंगामात जोस बटलरने आणि कोहलीने प्रत्येकी ४ शतके झळकावली आहेत.
सीएसकेशी विजेतेपदाचा सामना
सहावे विजेतेपद जिंकण्याचे मुंबईचे स्वप्न अखेल भंगले. गुजरातचा आता विजेतेपदाचा सामना चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध उद्या (रविवारी) होणार आहे. सीएसकेने पहिल्या क्वालिफायरमध्ये गुजरातचा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. या मोसमातील सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे पहिला सामनाही सीएसके आणि गुजरात यांच्यात खेळला गेला.
हेही वाचा :