छत्रपती संभाजीनगर: विहामांडवा येथील कालव्यामध्ये महिलेचा मृतदेह आढळला | पुढारी

छत्रपती संभाजीनगर: विहामांडवा येथील कालव्यामध्ये महिलेचा मृतदेह आढळला

पैठण; पुढारी वृत्तसेवा: पैठण तालुक्यातील विहामांडवा येथील कालव्यामध्ये एका ३५ वर्षे महिलेचा मृतदेह आढळून आला. ही घटना आज (दि. २१) दुपारी उघडकीस आली. महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. विहामांडवा पोलीस चौकीच्या पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पैठण तालुक्यातील विहामांडवा परिसरातील कालव्याच्या पाण्यामध्ये आज दुपारी एका महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याची माहिती विहामांडवा पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे यांना मिळाली. त्यानंतर सपोनि संतोष माने, सहाय्यक फौजदार सुधाकर मोहिते यांनी गावकऱ्यांच्या मदतीने महिलेचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. मृतदेह विहामांडवा येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे.

दरम्यान, टाकळी, विहामांडवा, हिंगणी परिसरातील कोणी महिला बेपत्ता असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन सपोनि संतोष माने, विहामांडवा पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे यांनी केले आहे.

हेही वाचा 

Back to top button