Asia Cup 2023 : आशिया कपचे सामने युरोपात खेळवणे हास्यास्पद | पुढारी

Asia Cup 2023 : आशिया कपचे सामने युरोपात खेळवणे हास्यास्पद

कराची; वृत्तसंस्था : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष नजम सेठी यांनी आशिया चषक स्पर्धेच्या यजमानपदावरून सुरू असलेला वाद संपवण्यासाठी एक अनोखी कल्पना सुचवली आहे. ही स्पर्धा आशियाई देशांबाहेर व्हावी आणि भारत-पाकिस्तान यांच्यातले सामने इंग्लंडच्या लॉर्डस् क्रिकेट मैदानावर खेळवण्यात यावे, असे सेठी यांचे म्हणणे आहे. (Asia Cup 2023)

मात्र, पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू रमीज राजा यांनी ही कल्पना फेटाळून लावली आहे. पीसीबीचे माजी अध्यक्ष राजा यांनी आशिया चषक युरोपियन भूमीवर खेळण्याच्या कल्पनेला विरोध केला आणि सेठींच्या मानसिक स्थिरतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. लॉर्डस्वर आशिया चषक खेळताना पाहून खूप आनंद होईल, असे पीसीबी अध्यक्षांचे म्हणणे ऐकून मला धक्का बसला. तो मानसिकद़ृष्ट्या स्थिर आहे की नाही?, राजा यांनी त्यांच्या यू ट्यूब चॅनेलवर सांगितले. वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी आशिया चषकाचा संपूर्ण मुद्दा हा होता की, संघांना उपखंडातील परिस्थितीशी जुळवून घेता येईल, असे ते पुढे म्हणाले. (Asia Cup 2023)

हेही वाचा;

Back to top button