IPL 2023 playoffs race : पंजाबच्‍या पराभवामुळे ‘प्‍ले-ऑफ’साठी मोठा ट्विस्ट, जाणून घ्‍या नवे समीकरण | पुढारी

IPL 2023 playoffs race : पंजाबच्‍या पराभवामुळे 'प्‍ले-ऑफ'साठी मोठा ट्विस्ट, जाणून घ्‍या नवे समीकरण

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्‍पर्धेत बुधवारी ( दि. १७) लढतीत दिल्लीने पंजाबचा १५ धावांनी पराभूत केला. विजयासाठी २१४ धावांचे लक्ष्य समोर ठेवून उतरलेल्या पंजाब किंग्‍जला ८ बाद १९८ धावांपर्यंतच मजल मारता आली. (PBKS vs DC) पंजाब किंग्‍जच्‍या पराभवामुळे आता स्‍पर्धेतील ‘प्‍ले-ऑफ’साठीचे (IPL 2023 playoffs race) समीकरण बदलले आहे.

मुंबई आणि आरसीबीचा मार्ग झाला सुकर

पंजाब किंग्‍ज संघाचा बुधवारी झालेल्‍या पराभवामुळे आताल सर्वाधिक फायदा हा मुंबई इंडियन्‍स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघांना झाला आहे. कारण पंजाब किंग्ज संघाचे १३ सामन्यांत केवळ १२ गुण आहेत. आता हा संघ जास्‍तीत जास्‍त १४ गुणांपर्यंत पोहोचू शकतो. तर मुंबई इंडियन्‍स संघाचे १३ सामन्यांत १४ गुण आहेत तर आरसीबीचे १२ सामन्यांत १२ गुण आहेत. दोघांना अजूनही १६ गुणांपर्यंत पोहोचण्याची संधी आहे. पंजाबने हा सामना जिंकला असता तर तेही १६ गुणांवर पोहोचले असते. मात्र त्याच्या पराभवामुळे मुंबई आणि आरसीबीच्या ‘प्‍ले-ऑफ’मध्‍ये जाण्‍याचा मार्ग सुकर झाला आहे. (IPL 2023 playoffs race)

पंजाबचा पराभव चेन्‍नई आणि लखनौसाठी ‘गूड न्‍यूज’

बुधवारच्‍या सामन्‍यात दिल्ली कॅपिटल्स संघाचा विजय झाल्‍याचा सर्वाधिक फायदा चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स संघांना झाला आहे. कारण या दोन्ही संघांचे १३-१३ सामन्यांमध्‍ये १५-१५ गुण आहेत. आता पंजाब पराभूत झाल्‍याने हे दोन्ही संघ शेवटचे सामने गमावूनही ‘प्लेऑफ’मध्ये पोहोचू शकतात. तसेच मुंबई आणि आरसीबीने 16-16 गुण गाठले तर या दोघांपैकी एक ‘प्ले-ऑफ’मध्ये प्रवेश करेल. जर मुंबई आणि आरसीबी संघाने एक सामना गमावला तरी चेन्नई आणि लखनौ 15-15 गुणांवरच प्लेऑफमध्ये पोहोचतील. म्हणजेच आजच्या (दि.१८) सामन्यात हैदराबादविरुद्ध आरसीबीचा पराभव झाला तर चेन्नई आणि लखनौ प्लेऑफमध्ये पोहोचतील.

IPL 2023 playoffs race : … तर १४ गुणांवरही ‘प्‍ले-ऑफ’चे तिकीट शक्‍य

सध्याच्‍या गुणतालिकेनुसार १४ गुणांवरही एक संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकतो. त्यामुळे पंजाब किंग्ज, कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स शर्यतीत राहिले. जर आरसीबीने दोनपैकी फक्त एकच सामना जिंकला आणि मुंबईने शेवटचा सामना गमावला तर दोघांचे 14-14 गुण होतील. पंजाब, केकेआर आणि राजस्थानलाही १४ गुणांपर्यंत पोहोचण्याची संधी आहे. अशा स्थितीत यापैकी एक संघ चांगल्या धावगतीने ‘प्ले-ऑफ’मध्ये पोहोचेल.

हेही वाचा : 

 

 

 

Back to top button