पुढारी ऑनलाईन : आशिया चषक २०२३ (Asia Cup 2023) क्रिकेट स्पर्धा श्रीलंकेत आयोजित केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्ड अधिकाऱ्यांनी यंदाची आशिया चषक स्पर्धा श्रीलंकेत (Sri Lanka) घेण्यास विरोध केला आहे. त्यांचा हा प्रस्ताव आशियाई क्रिकेट परिषदेने (Asian Cricket Council) मान्य न केल्यास पाकिस्तान क्रिकेट बोर्ड या स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रानी दिली आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख नजम सेठी यांनी मंगळवारी दुबईमध्ये आशियाई क्रिकेट परिषदेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि आशिया चषक स्पर्धा श्रीलंकेत घेण्यावर आक्षेप घेतला.
ACC ने आशिया चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानचे सुधारित मॉडेल प्रस्तावाचे वेळापत्रक स्वीकारले पाहिजे आणि जर बहुतांश सदस्यांना स्पर्धा इतरत्र व्हावी असे वाटत असल्यास ती २०१८ आणि २०२२ प्रमाणे यूएईमध्ये आयोजित केली जावी, असे सेठी यांनी म्हटले आहे. सेठी यांनी बीसीसीआयची चिंता फेटाळून लावली आहे. "बीसीसीआयने सप्टेंबर ते नोव्हेंबर २०२० मध्ये यूएईमध्ये आयपीएल आयोजित केल्याचे निदर्शनास आणून देत सप्टेंबरमधील यूएईमधील वातावरण क्रिकेट खेळण्यास अनुकूल नसल्याचे एसीसीला कळवले आहे, " असे Pakistan Cricket Board मधील एका सूत्राने सांगितले.
"मी तुम्हाला इतके सांगू शकतो की सेठी यांनी नवीन हायब्रीड मॉडेल शेड्यूल ACC कडे सादर केले आहे आणि हा प्रस्ताव त्यांनी आता नाकारू नये," असाही खुलासा त्याने केला आहे.
सूत्राने पुढे सांगितले की, पीसीबीला हे ऐकून आश्चर्य वाटले की बीसीसीआयच्या (BCCI) पाठिंब्याने श्रीलंका बोर्डाने एसीसीला सांगितले की ते यावर्षी आशिया चषक आयोजित करू इच्छित आहेत.
"हे आश्चर्यकारक आहे, कारण यापूर्वी फेब्रुवारीमध्ये झालेल्या ACC बोर्डाच्या बैठकीत पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानने श्रीलंकेत आशिया चषक स्पर्धा खेळवण्याचा प्रस्ताव नाकारला होता आणि पाकिस्तानकडे या स्पर्धेचे यजमान राहील असे मान्य केले होते." दुबईला जाण्यापूर्वी सेठी यांनी, जर देशात आशिया चषक स्पर्धा आयोजित केली गेली नाही तर आशियाई स्तरावर यावर्षी पाकिस्तानमध्ये ३ ते ३ देशांचा सहभाग असलेली स्पर्धा आयोजित करण्याच्या तयारीला लागावे, असे अधिकाऱ्यांना सांगितले आहे. (Asia Cup 2023)
हे ही वाचा :