Asia Cup 2023 : आशिया चषक पाकिस्तानमध्ये, पण भारत सामने खेळणार ‘या’ तटस्थ देशांत | पुढारी

Asia Cup 2023 : आशिया चषक पाकिस्तानमध्ये, पण भारत सामने खेळणार 'या' तटस्थ देशांत

पुढारी ऑनलाईन डेस्क : आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे. सप्टेंबरमध्ये होणाऱ्या या स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानला न जाण्याच्या निर्णयावर ठाम आहे. त्यामुळे दोन्ही क्रिकेट मंडळांमध्ये तणावाचे वातावरण आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोन्ही बोर्डांमध्ये एक करार केला जात आहे की, भारताचे सामने तटस्थ ठिकाणी खेळवले जाऊ शकतात तर उर्वरित संघांचे  सामने पाकिस्तानमध्ये खेळवले जाणार आहेत. (Asia Cup 2023)

अलीकडेच, या संदर्भात आशियाई क्रिकेट परिषदेची (ACC) बैठक झाली. ज्यामध्ये बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकार्‍यांव्यतिरिक्त, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी उपस्थित होते. वृत्तानुसार, पाकिस्तानने या बैठकीत सांगितले की, आशिया कपचे यजमानपद पूर्णपणे काढून घेतल्यास ते स्पर्धेवर बहिष्कार टाकतील. यानंतर पीसीबी आणि एसीसी अधिकाऱ्यांची अनौपचारिक बैठक झाली ज्यामध्ये ही स्पर्धा दोन देशांमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  (Asia Cup 2023)

ज्यामध्ये भारताचे सामने पाकिस्तानबाहेर खेळवण्यात येणार आहेत. ही तटस्थ ठिकाणे श्रीलंका, संयुक्त अरब अमिराती (यूएई), ओमान किंवा इंग्लंड असू शकतात येथे भारताचे किमान पाच सामने  खेळवण्यात येतील. आशिया चषक स्पर्धेत भारत वगळता उर्वरित पाच देशांचे सामने पाकिस्तानमध्येच होणार आहेत. आशिया चषकापूर्वी टीम इंडिया आयर्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर भारतीय खेळाडूंना जास्त प्रवास करण्याची परवानगी न मिळाल्यास टीम इंडियाचे आशिया चषकमधील सामने इंग्लंडमध्ये होवू शकतात.

हेही वाचा;

Back to top button