MS Dhoni Retirement: ‘मी ट्रॉफी जिंकून…’, धोनीने रिटायरमेंटचा प्लॅन केला जाहीर | पुढारी

MS Dhoni Retirement: ‘मी ट्रॉफी जिंकून...’, धोनीने रिटायरमेंटचा प्लॅन केला जाहीर

पुढारी ऑनलाईन डेस्क : MS Dhoni Retirement : आयपीएलच्या 16 व्या हंगामानंतर चेन्नई सुपर किंग्कचा कर्णधार एमएस धोनी निवृत्ती घेईल असे भाकीत अनेकांनी केले आहे. पण, माही किंवा सीएसके संघाने याला दुजोरा दिलेला नाही. दरम्यान, सीएसकेचा माजी खेळाडू सुरेश रैनाने धोनीच्या निवृत्तीवरून मोठा खुलासा केला आहे. ज्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

रैना म्हणाला की, धोनीने मला त्याच्या निवृत्तीच्या योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. यंदाची आयपीएल ट्रॉफी जिंकणे हे त्याचे टार्गेट आहे. त्यानंतर आणखी एक वर्ष तो खेळेल, असा खुद्द धोनीने खुलासा केला असल्याचे सांगितले आहे.

धोनी आयपीएलचा 17 वा हंगाम खेळणार (MS Dhoni Retirement)

निवृत्तीनंतर सुरेश रैना आता कॉमेंट्री करताना दिसत आहे. अलीकडेच सीएसकेच्या सामन्यादरम्यान रैनाने एमएस धोनीची भेट घेतली. दोघे जुने सहकारी एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून फिरताना दिसले. त्यादरम्यान त्यांच्यात काय संवाद झाला याचा संदर्भ देत रैनाने महत्त्वाचा खुलासा केला.

ट्रॉफी जिंकल्यानंतर धोनी आणखी एक वर्ष खेळणार आहे, असे रैनाने स्पष्ट केले. त्याच्या याविधानावरून धोनी अजून पुढील सीझनमध्ये खेळताना दिसणार असून चाहत्यांनी यावरून आनंद व्यक्त केला आहे. (MS Dhoni Retirement)

धोनीच्या मनात काय चालले असेल याचा अंदाज लावणे देखील अशक्य आहे. त्याने नेहमीच आपल्या निर्णयाने क्रिकेट जगताला चकित केले आहे. मग ते मैदानावर घेतलेले त्याचे निर्णय असोत किंवा वैयक्तिक निर्णय. त्यामुळे येत्या आयपीएल सीझनमध्ये माही खेळताना दिसणार की नाही याचा निर्णयही त्याच्या हातात असेल. अलीकडेच एलएसजीविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात समालोचक डॅनी मॉरिसनने धोनीला विचारले की यंदाचा त्याचा शेवटचा हंगाम आहे का? यावर एमएस हसला आणि म्हणाला, ‘तुम्ही लोकांनी ठरवले आहे की ही माझी शेवटची आयपीएल स्पर्धा आहे, मी ठरवलेले नाही.’

गुणतालिकेत सीएसके दुसऱ्या स्थानावर

चेन्नई सुपर किंग्जने आतापर्यंत खेळलेल्या 11 सामन्यांपैकी 6 सामने जिंकले आहेत. यासह, ते 13 गुणांसह गुणतालिकेत दुस-या स्थानावर आहेत, यावरून असा अंदाज लावला जाऊ शकतो की एमएस धोनीचा संघ यावेळी प्लेऑफमध्ये नक्कीच पोहोचू शकेल.

Back to top button