

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलचा 16 वा सीझन (ipl 16th edition) आता अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे. स्पर्धेत आतापर्यंत एकूण 52 सामने खेळले गेले असून ज्यात एकापेक्षा एक लढती झाल्या आहेत. या दरम्यान अनेक जुने विक्रम मोडीत निघाले आहेत. तर अनेक नवे विक्रम रचले गेले आहेत. असा एक अनोखा विक्रम यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्यांदाच घडला आहे.
एकाच आयपीएल (IPL) सीझनमध्ये विविध देशांतील सर्वाधिक खेळाडूंनी सामनावीर पुरस्कार जिंकण्याचा हा विक्रम आहे. यावर्षी भारतासह एकूण 10 देशांच्या खेळाडूंना प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार (ipl player of the match) देण्यात आला असून आयपीएलच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले आहे.
या वर्षी आतापर्यंत एकूण 22 भारतीय खेळाडूंनी प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कारावर मोहोर उमटवली आहे. याशिवाय इंग्लंड, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे, आयर्लंड आणि श्रीलंका या देशांच्या खेळाडूंनी हा पुरस्कार पटकावून इतिहास रचला आहे.
भारत : अर्शदीप सिंग, साई सुदर्शन, शार्दुल ठाकूर, कृणाल पंड्या, यशस्वी जैस्वाल, रवींद्र जडेजा, रिंकू सिंह, शिखर धवन, रोहित शर्मा, रविचंद्रन अश्विन, मोहित शर्मा, विराट कोहली, व्यंकटेश अय्यर, मोहम्मद सिराज, इशांत शर्मा, अजिंक्य रहाणे, अक्षर पटेल, अभिनव मनोहर, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, इशान किशन, शुभमन गिल
इंग्लंड : हॅरी ब्रूक, जोस बटलर, सॅम कुरेन, मार्क वुड, मोईन अली, फिलिप सॉल्ट
ऑस्ट्रेलिया : मार्कस स्टॉइनिस, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल
वेस्ट इंडिज : निकोलस पूरन, शिमरॉन हेटमायर
अफगाणिस्तान : राशिद खान
दक्षिण आफ्रिका : फाफ डुप्लेसी
झिम्बाब्वे : सिकंदर रझा
न्यूझीलंड : डेव्हॉन कॉनवे, ग्लेन फिलिप्स
आयर्लंड : जोशुआ लिटल
श्रीलंका : मतिशा पाथिराना
बांगलादेश आणि नामिबियाचे खेळाडू जे 16 व्या सीझनचा भाग होते, त्यांना अद्याप सामनावीर पुरस्कार जिंकता आलेला नाही. बांगलादेशचा लिटन दास केकेआर संघाचा भाग होता, पण वैयक्तिक कारणांमुळे तो मायदेशी परतला, तर शाकिबने स्पर्धा सुरू होण्यापूर्वी माघार घेतली. नामिबियाचा डेव्हिड विजा केकेआरसाठी खेळत आहे. पण त्याला अजून चमकदार कामगिरी करता आलेली नाही.