Sourav Ganguly: कोहली-गंभीरच्या भांडणावरून सौरव गांगुलीचे मोठे विधान, म्हणाला...(Video) | पुढारी

Sourav Ganguly: कोहली-गंभीरच्या भांडणावरून सौरव गांगुलीचे मोठे विधान, म्हणाला...(Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) यांच्यातील सामन्यादरम्यान विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात जोरदार वाद झाला. सामना होऊन आठवडा झाला तरी त्या भांडणाची चर्चा आजही होत आहे. दोघांच्या वादावादीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायलर झाले. ते पाहिल्यावर वादाची तिव्रता लक्षात येते. या प्रकाराची बीसीसीआयने गंभार दखल घेतली आणि दोन्ही खेळाडूंना मॅच फीच्या 100 टक्के दंड ठोठावला.

दरम्यान, सुनील गावसकर आणि वीरेंद्र सेहवाग या भारताच्या माजी खेळाडूंनीही झालेल्या प्रकारावरून संताप व्यक्त केला. त्या दोघांनी कोहली आणि गंभीर यांच्यावर आर्थिक दंड ठोठावण्याऐवजी चक्क बंदीच घाला अशी मागणी केली. आता यात टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) उडी घेत मोठे विधान केले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने त्याच्या वक्तव्याचा व्हिडिओ जारी केला आहे.

एका कार्यक्रमादरम्यान दिल्ली कॅपिटल्सचा (DC) मेंटॉर असणा-या गांगुलीला (Sourav Ganguly) कोहली आणि गंभीर यांच्यातील वादावर प्रश्न विचारला. यावर प्रतिक्रिया देत गांगुली म्हणाला की, त्यांना भांडायचे आहे तर भांडू द्या. तिथे काय झाले आहे ते मला माहीत नाही, मी फक्त वर्तमानपत्रात त्या घटनेचे विनेचन वाचले. क्रीडाविश्वात मला एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे ज्या गोष्टींची तुम्हाला पूर्ण माहिती नाही त्याबद्दल आपले मत देऊ नये. मला आशा आहे जे काय घडले आहे ते प्रकरणार पडदा पडला असेल.

Back to top button