Team India ICC Test Rankings: डब्ल्यूटीसी फायनलपूर्वी टीम इंडिया कसोटी क्रमवारीत नंबर वन | पुढारी

Team India ICC Test Rankings: डब्ल्यूटीसी फायनलपूर्वी टीम इंडिया कसोटी क्रमवारीत नंबर वन

पुढारी ऑनलाईन डेस्क : Team India ICC Test Rankings : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलपूर्वी टीम इंडियासाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. आयसीसीने वार्षिक कसोटी क्रमवारी अपडेट केली असून यात टीम इंडियाने अव्वल स्थान पटकावले आहे. 7 जून ते 11 जून दरम्यान लंडनमधील ओव्हल येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात डब्ल्यूटीसीची फायनल रंगणार आहे.

टीम इंडियाच्या खात्यात 25 सामन्यांतून 3031 गुण जमा झाले असून रेटिंग 121 आहे. तर ऑस्ट्रेलियाचे 23 सामन्यांतून 2679 गुण झाले आहेत आणि त्यांचे 116 रेटिंग आहे. अशा प्रकारे भारत पहिल्या तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंड तिसऱ्या स्थानावर आहे. तर दक्षिण आफ्रिका चौथ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंड सध्या पाचव्या स्थानावर आहे. (Team India ICC Test Rankings)]

या वर्षाच्या सुरुवातीला टीम इंडियाने कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाचा 2-1 असा पराभव करून सलग चौथ्यांदा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली. नुकत्याच झालेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. या मालिकेत भारतीय संघ 2-1 असा विजय मिळवला. टीम इंडियाने दिल्ली आणि नागपूर कसोटीत कांगारूंना धुळ चारली. अशा प्रकारे टीम इंडिया आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचण्यात यशस्वी ठरली. ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. ऑस्ट्रेलियन संघ कसोटी क्रमवारीत 15 महिने अव्वल स्थानावर राहिला.

टी-20 क्रमवारीतही टीम इंडिया अव्वल

टीम इंडिया आयसीसी टी-20 क्रमवारीतही अव्वल स्थानावर आहे. या यादीत इंग्लंड दुसऱ्या, न्यूझीलंड तिसऱ्या, पाकिस्तान चौथ्या आणि दक्षिण आफ्रिका पाचव्या क्रमांकावर आहे.

संघ क्रमवारी कधी अपडेट केली जाते?

आयसीसी प्रत्येक मालिकेनंतर संघांची क्रमवारी अपडेट करते. श्रीलंका आणि आयर्लंड यांच्यातील कसोटी मालिका 28 एप्रिल रोजी संपली. त्यानंतर मंगळवारी कसोटी संघाची क्रमवारी अपडेट करण्यात आली. (Team India ICC Test Rankings)

जय शहा यांच्याकडून संघाचे अभिनंदन

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी टीम इंडियाचे अभिनंदन केले आहे. त्यांनी ट्विट करून म्हटले की, ‘जगातील नंबर वन कसोटी संघ झाल्याबद्दल भारतीय संघाचे अभिनंदन. जगातील नंबर वन कसोटी संघाचा दर्जा मिळणे ही संघाची मायदेशात आणि घराबाहेरील कामगिरी प्रतिबिंबित करते. कसोटीशिवाय आम्ही टी-20 मध्येही नंबर वन आहोत.’

Back to top button