Serena Williams | सेरेना विल्यम्स दुसऱ्यांदा आई होणार, Met Gala 2023 च्या रेड कार्पेटवर प्रेग्नेसीचा खुलासा | पुढारी

Serena Williams | सेरेना विल्यम्स दुसऱ्यांदा आई होणार, Met Gala 2023 च्या रेड कार्पेटवर प्रेग्नेसीचा खुलासा

पुढारी ऑनलाईन : दिग्गज टेनिसपटू सेरेना विल्यम्स (Serena Williams) दुसऱ्यांदा आई होणार आहे. फॅशनच्या जगातील सर्वात मोठा आणि प्रसिद्ध फॅशन शो मेट गालाच्या रेड कार्पेटवर (Met Gala 2023 red carpet) सेरेनाने तिच्या प्रेग्नेसीचा खुलासा केला. यामुळे सेरेना आणि तिचा पती अॅलेक्सिस ओहानियन यांच्या घरात आता लवकरच दुसऱ्या बाळाचे आगमन होणार आहे. सेरेनाने पांढऱ्या स्कर्टसह फिट काळ्या रंगाचा गाऊन घातला होता. यावेळी तिने बेबी बंप फ्लॉट केले. यावेळी तिच्यासोबत तिचा पती अॅलेक्सिस होता. २३ ग्रँड स्लॅम चॅम्पियन असलेल्या सेरेनाने मंगळवारी मेट गाला (met gala 2023) रेड कार्पेटवरील दोघांचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. (Met Gala 2023)

फोटो शेअर करत तिने म्हटले आहे की, “जेव्हा अॅना विंटूरने आम्हा तिघांना मेट गालासाठी आमंत्रित केले तेव्हा खूप आनंद झाला.” गेल्या वर्षी सेरेनाने अद्याप टेनिसमधून निवृत्ती घेतली नसल्याचे स्पष्ट केले होते. सेरेनाने गेल्या वर्षी ९ ऑगस्ट रोजी टेनिसमधून निवृत्ती घेणार असल्याचे जाहीर केले होते. पण नुकत्याच पार पडलेल्या यूएस ओपननंतर तिने कोर्टवर परत येणार असल्याची शक्यता अधिक असल्याचे नमूद केले आहे. “मी निवृत्ती घेतलेली नाही,” असे विल्यम्सने सॅन फ्रान्सिस्कोमधील एका परिषदेत तिच्या गुंतवणूक कंपनीची जाहिरात करताना सांगितले होते.

सप्टेंबरमधील यूएस ओपन २०२२ (US Opens 2022) स्पर्धेत सेरेना विल्यम्सला (Serena Williams) पराभवाचा धक्का बसला होता. महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीत सेरेना विल्यम्सचा ऑस्ट्रेलियाच्या अजला टॉमलजानोविकने (Ajla Tomljanovic) पराभव केला होता. २७ वर्षांच्या कारकिर्दीत सेरेनाने २३ ग्रँडस्लॅम एकेरी विजेतेपदे जिंकली आहेत.

“मी कोर्टवर परत येण्याची शक्यता खूप जास्त आहे. तुम्ही माझ्या घरी येऊ शकता, माझ्याकडे कोर्ट आहे,” असे तिने म्हटले आहे. ४० वर्षीय या टेनिस स्टारने सांगितले की तिला तिच्या कुटुंबाकडे लक्ष द्यायचे आहे. “मला सेवानिवृत्ती हा शब्द कधीच आवडला नाही. तो मला आधुनिक शब्दासारखा वाटत नाही. मी त्याकडे परिवर्तन म्हणून पहात आहे, परंतु मी तो शब्द कसा वापरतो याबद्दल मी संवेदनशील व्हायचे आहे, ज्याचा अर्थ काहीतरी विशिष्ट असून तो लोकांसाठी महत्वाचा आहे,” असे सेरेनाने (tennis player serena williams) व्होग मासिकाच्या लेखात म्हटले होते.

सेरेना विल्यम्सने २०१७ मध्ये शेवटचे ग्रँडस्लॅम जिंकले होते. सेरेनाने आतापर्यंत २३ एकेरी ग्रँडस्लॅम जिंकली असून मार्गारेट कोर्टच्या विक्रमाशी बरोबरी करण्यापासून ती एक ग्रँडस्लॅम दूर आहे. २०१७ मध्ये मुलगी ऑलिम्पियाला जन्म दिल्यानंतर चार वेळा फायनलमध्ये पोहोचूनही तिला अंतिम सामना जिेकता आला नव्हता. त्यामुळे तिला मार्गारेट कोर्टच्या विक्रमाशी बरोबरी करता आली नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Serena Williams (@serenawilliams)

हे ही वाचा :

Back to top button